पंढरपूर --प्रतिनिधी
प्रभा हिरा प्रतिष्ठान पंढरपूर संचलित पालक विज्ञान मंदिर प्रशालेमध्ये ७७ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ.शीतल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी "मेरी माटी मेरा देश" या अभियाना अंतर्गत स्वातंत्र्यप्राप्तीसाठी जे थोर देशभक्त वीर देशासाठी शहीद झाले अशा महान व्यक्तींच्या जीवनातील प्रसंगावर आधारित कार्यक्रम पालवीतील बालकांनी सादर केला.
यावेळी प्रभारी गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे, मंगलताई शहा, रंजना अष्टेकर, डिंपल घाडगे, लक्ष्मी टाकळीच्या सरपंच विजयमाला वाळके, सचिन वाळके, उपसरपंच संजय साठे, डॉ.लीना घाडगे, श्रीकांत कवडे, आदी मान्यवर उपस्थित होते. पालवीतील बालकांनी सादर केलेला 'मेरी माटी मेरा देश' कार्यक्रम पाहून उपस्थित सर्व भारावून गेले.
गटशिक्षणाधिकारी मारुती लिगाडे म्हणाले, पालवीतील बालकांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्या देशभक्तांचा जीवनावर आधारित सादर केलेले प्रसंग पाहून उर अभिमानाने भरून आला. या बालकांवर मंगलताई व सर्व शिक्षक सहकाऱ्यांनी केलेले संस्कार दिसून आले. या कार्यक्रमासाठी पंढरपूर परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
शैक्षणिक