पंढरपूर प्रतिनिधी --
पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या शुभहस्ते व उपविभागीय अधिकारी तथा नगर परिषदेचे प्रशासक गजानन गुरव साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत झेंडावंदन कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी ध्वजनी म्हणून उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांनी काम पाहिले ,या झेंडावंदन कार्यक्रमास नगर परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags
शासकीय