नवनिर्माण सेनेचे उपशहराध्यक्ष प्रदीप परचंडे आयोजित संगीत खुर्ची, लिंबू चमचा यात विजयी झालेल्या स्पर्धकांचा सन्मान
पंढरपूर प्रतिनिधी --
पंढरपूर शहरातील जुनी पेठ येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपशहराध्यक्ष प्रदीप परचंडे यांनी नागपंचमी सणानिमित्त आयोजित केलेल्या संगीत खुर्ची, लिंबू चमचा यात विजयी झालेल्या स्पर्धकांना मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या वतीने देण्यात आलेल्या पैठणी साड्यांचे बक्षीस वितरण मनसेच्या माधुरी दिलीप धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
संगीत खुर्ची स्पर्धेत आशाताई आनंत परचंडे, सारिका ताई रोहित मिसाळ, बालिका ताई अतुल कांबळे, या विजयी झाल्या तर लिंबू चमचा स्पर्धेत पूजाताई सागर सिताफ व सारिका ताई निलेश अधटराव या विजयी झाल्या.
यावेळी महिला युवा सेनेच्या अध्यक्ष पूनम ताई अभंगराव, मनसे महिला शहर अध्यक्ष रंजनताई इंगोले, मनसे महिला शहर उपाध्यक्ष पुनमताई विधाते, अश्विनीताई प्रदीप परचंडे, सुनिता ताई परचंडे, नम्रता ताई तावस्कर, सुप्रियाताई कोळी, राधाताई अभंगराव, कावेरी ताई प्रचंडे, इत्यादी उपस्थित होते.
Tags
राजकीय