सिंचनाशी निगडीत संस्थांचा व्यवस्थापनात सहभाग वाढवून सिंचन व्यवस्थापन सक्षम करणे बाबत बैठक संपन्न

या बैठकीत विविध विषयावर सकारात्मक विचार विनिमय झाला तसेच १० साखर कारखाना पैकी ९ साखर कारखान्यांनी को.प.बंधा-याच्या व्यवस्थापनात सहभागी होण्यास इच्छुक 
पंढरपूर प्रतिनिधी--
भीमा पाटबंधारे विभाग पंढरपूर येथे दि.१७ ऑगस्ट रोजी सो.क.हरसुरे कार्यकारी अभियंता भीमापाटबंधारे विभाग, पंढरपूर यांचे कार्यालयात सिंचनाशी निगडीत संस्थांचा व्यवस्थापनात सहभाग वाढवून सिंचन व्यवस्थापन सक्षम करणे बाबत बैठक संपन्न झाली.
   या वेळी सदर बैठकीस व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारेआमदार  समाधान महादेव आवताडे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा सदस्य मा. आ.हर्षवर्धन शहाजीराव पाटील माजी सहकार मंत्री, कल्याणराव वसंतराव काळे चेअरमन,सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह.सा.का.लि. भाळवणी ,अभिजित धनंजय पाटील चेअरमन,विठठल सहकारी साखर कारखाना लि. वेणुनगर, प्रत्यक्ष उपस्थित लालासाहेब पवार,चेअरमन निरा भिमा सहकारी साखर कारखाना
लि.शहाजीनगर, अमर पाटील कार्यकारी संचालक, धाराशिव सहकारी साखर कारखाना लि. बाकी शिवणे,  डी. आर. गायकवाड, कार्यकारी संचालक, श्री विठठल सहकारी साखर कारखाना लि. वेणुनगर गुरसाळे ता. पंढरपूर, इंगले एन.जे. सिव्हिल इंजिनिअर, पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि. श्रीपूर ता. माळशिरस जि.सोलापूर शेखर एस.ए. सिव्हिल इंजिनिअर,सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील साखर कारखाना लि. शंकरनगर, प्राचार्य बी. पी. रोंगे श्री.विठ्ठल शिक्षण व संशोधन संस्था गोपाळपुर, प्रा.ड्रॉ. चेतन पिसे, सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग कोर्टी,भोसले अनिल, सिव्हिल इंजिनिअर, युटोपियन शुगर्स लि. कचरेवाडी ता. मंगळवेढा जि. सोलापूर, राजेंद्र वायदंडे, सिव्हिल इंजिनिअर, सिताराम महाराज साखर कारखाना लि. खर्डी ता. पंढरपूर जि. सोलापूर. यांचे समवेत बैठकीत सिंचनाशी निगडीत संस्थांचा व्यवस्थापनात सहभाग वाढवून सिंचन व्यवस्थापन सक्षम करणे बाबत एकमत झाले. व खालील विषयावर विचार विनिमय झाला.

   कार्यक्षेत्रातील को.प.बंधा-यांचे
व्यवस्थापनात सहकारी संस्थेचा सहभाग घेऊन केलेल्या कामाच्या आधारे वार्षिक पाणीपट्टी मध्ये सवलत देणे, आकस्मित देयके, विलंब शुल्क तसेच शेतक-यांच्या ऊस बिलातून सिंचन पाणीपट्टी कपात करणे. को.प.बंधा-याचा परिचलनाच्या प्रचलित पध्दती ऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी संशोधन करणे व या बाबत अभिप्राय मागविणे बाबत बैठकमध्ये सकारात्मक चर्चा झाली. आणि १० साखर कारखाना पैकी ९ साखर कारखान्यांनी को.प.बंधा-याच्या व्यवस्थापनात सहभागी होण्यास इच्छुक असल्याचे सांगितले.भीमा पाटबंधार विभाग, पंढरपूर मार्फत सुचविण्यात आलेल्या विषयांकित प्रस्तावांचे उपस्थितांमार्फत स्वागत करण्यात आहे.
यावेळी भीमा पाटबंधारे विभागा मार्फत उपस्थितांचा सन्मान करण्यात आला. या वेळी भीमा पाटबंधारे विभागाकडील उपअभियंता, शाखाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form