कुष्ठरोग वसाहतीतील महिलांना साडी चोळी वाटप

समाजसेवक हनुमंत मोरे यांचा पंढरीत स्तुत्य उपक्रम
पंढरपूर (प्रतिनिधी)
समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या कुष्ठरोगी  समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. यात समाजसेवक हनुमंत मोरे यांच्यासारख्या धुरीनांची मदतही होत आहे. अधिक मासात पंढरपूरमधील कुष्ठरोगी वसाहतीतील महिलांना साडीचोळी देऊन त्यांचा सन्मान करण्याचे काम हनुमंत मोरे यांनी केले आहे. त्यांच्या या कामाचे कौतुक पंढरपूर परिसरात होत आहे.

 त्यांच्याकडून आजपर्यंत अनेक समाजकार्य घडली आहेत. गोरगरिबांसाठी रक्तदान शिबिरे, गोरगरिबांना अन्न वाटप, खाऊ वाटप, याशिवाय दिवाळी निमित्त साखरेचे वाटपही त्यांच्याकडून दरवर्षीच होत असते. याशिवाय नागरिकांच्या मूलभूत समस्या अन्न, वस्त्र, निवारा या भागवण्यासाठीही त्यांनी आजपर्यंत मोठे काम केले आहे. समाजातील गरीब घरातील मुलींची लग्नकार्य स्वखर्चाने करून त्यांनी समाजापुढे आदर्श मांडला आहे. या त्यांच्या कामामुळेच ते समाजसेवक म्हणून पुढे आले आहेत.


सध्या अधिक मास चालू आहे. या मासात काहीतरी पुण्यकर्म करावे अशी प्रत्येकाची भावना असते. यानिमित्ताने अनेक जण देवदर्शनासाठी निघतात. कोणी अन्नदान करतात, समाजसेवक हनुमंत मोरे यांनी मात्र वेगळेच पुण्यकर्म केले आहे. पंढरपूर शहरातील गोपाळपूर नजीक असलेल्या कुष्ठरोगी वसाहतीमधील महिलांना साडीचोळी वाटप करून त्यांनी त्यांचा आशीर्वाद घेतला आहे. त्यांच्या या कृतीने त्यांचे या परिसरातून मोठे कौतुक होत आहे. स्वातंत्र्य मिळून कित्येक वर्षे लोटली तरीही हा समाज समाज व्यवस्थेपासून दूरच आहे. या समाजास मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सरकारमार्फत सुरू आहे परंतु अपुऱ्या राजकीय इच्छाशक्तीमुळे हे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरत आहेत. हनुमंत मोरे यांच्यासारखे समाजसेवकच ही गोष्ट करू शकतात, यावर समाजातील जाणकारांचा मोठा विश्वास आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form