श्री पांडुरंग प्रतिष्ठानच्या मार्गदर्शिका सौ. सीमाताई परिचारक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
पंढरपूर प्रतिनिधी--
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी शेळवे पंढरपूर येथे १५ ऑगस्ट २०२३ रोजी भारताचा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्री पांडुरंग प्रतिष्ठानच्या मार्गदर्शिका सौ. सीमाताई परिचारक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
पूढे बोलताना ते म्हणाले की,भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात एक राष्ट्र या संकल्पनेशी एकरूप राहण्याची प्रेरणा देणारा आज चा दिवस असून या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी तन, मन, आणि धनाने बलिदान दिलेल्या शुर वीरांचे स्मरण करण्याचा दिवस आहे असे सांगून त्यांनी उपस्थितांमध्ये राष्ट्र प्रेमाची भावना जागृत केली. भारताला शक्तिशाली बनविण्याचे सामर्थ्य हे तरुणांमध्ये असून प्रत्येकानी एक जबाबदार नागरिक बनण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावे असे सांगून त्यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मोहसीन शेख, विभागप्रमुख प्रा. धनंजय शिवपूजे, प्रा. अनिल बाबर, प्रा. राहुल पांचाळ, प्रा. दीपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने व इतर सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते