पंढरपूर प्रतिनिधी--
पंढरपूर शहरातील आदर्श बालक व प्राथमिक मंदिर या शाळेत, स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रोहिणी कोर्टीकर या होत्या. यावेळी मुख्याध्यापिका माया सांगोलकर व रंजनी देशपांडे यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होते.
यावेळी समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांच्या वतिने पंढरपूर शहरातील आदर्श बालक व प्राथमिक मंदिर या शाळेत, स्वातंत्र्यदिना निमित्त दोन्ही शाखांमधील शाळेतील विद्यार्थ्यासांठी मोफत प्रथमोपचार उपचार पेटी भेट देण्यात आली.
या प्रथमोपचार पेटीचे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रोहिणी कोर्टीकर, मुख्याध्यापिका माया सांगोलकर व रजनी देशपांडे या उभयतांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तसेच शिक्षक महिलांना तिरंगी फेटे बांधून सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमावेळी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक याकार्याचे कौतुक करण्यात आले.
यावेळी शाळेच्या वतीने अधिक मासा निमित्ताने ३३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी रजनी देशपांडे, सुजाता कुलकर्णी, नीता तरळगट्टी, मीरा मुंढे, सोनाली शिंदे, सुवर्णा सपकाळ, सुरेखा जाधव, संगीता कोकणी, आशा पाटील, अन्नपूर्णा धायगोंडे, बालवाडी सर्व शिक्षिका, विद्यार्थी, पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजसेवक मुजम्मील कमलीवाले हे आपल्या सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात. समाजसेवक मुजम्मील कमलीवाले हे पंढरपूर शहरातील आदर्श व्यक्तिमत्व आहेत. ते गेल्या काही वर्षापासून पंढरपूरात चांगले परिचित झाले आहेत. आतापर्यंत त्यांनी श्री विठ्ठल मंदीरामध्ये महिलांसाठी हिरकणी कक्षाची स्थापना केली, बेघर-गरीब असणाऱ्या महिलांना सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप केले आहे, तसेच गरजू-गरीब महिलांसाठी व्हिटॅमिन-सी व रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या एनर्जी ड्रिंक चे मोफत वाटप केले. त्यांनी मागील तीन वर्षांत कोरोना काळात त्यांनी केलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद आहेत. समाजाप्रती असलेले हे त्यांचे प्रेम त्यांनी आपल्या कर्तृत्वातुन दाखवुन दिले आहे.यामुळेच आजवर त्यांना विविध राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्याद्वारे शाळेमध्ये केलेल्या या उपक्रमामुळे पंढरपूरातील महिला शिक्षक व सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे...
Tags
सामाजिक