अभिजित पाटलांच्या मागे खंबीरपणे उभे राहा ---देशाचे नेते शरदचंद्रजी पवार

जेसीबीतून फुले उधळली, क्रेनद्वारे हार घातले; मंगळवेढ्यात शरदचंद्रजी पवारांचे जंगी स्वागत, कार्यकर्त्यांचे शक्तीप्रदर्शन....
पंढरपूर प्रतिनिधी --
मंगळवेढा व पंढरपूर येथील जनतेने मतदारसंघाच्या विकासासाठी अभिजीत पाटलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांनी केले आहे. श्री.संत दामाजी पंथाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मंगळवेढ्याच्या नगरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचे जेसीबीने पुष्पवृष्टी करण्यात आली व जंगी स्वागत करण्यात आले ते दामाजी चौकात आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते.
  अभिजित पाटलांच्या मागे खंबीरपणे उभे राहा असे अहवाल शरदचंद्रजी पवार यांनी मंगळवेढ्यातील जनतेला केले.यावेळी आमदार शशिकांत शिंदे, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, महेश कोठे, शहराध्यक्ष चंद्रशेखर कौडूभैरी, विद्या विकास मंडळ या संस्थेचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, किसन गवळी, मुजफ्फर काझी, संदीप बुरकुल, नागेश राऊत,रविराज मोहिते, आयाज शेख,जमीर इनामदार,रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा,धनश्रीचे प्रमुख प्रा.शिवाजीराव काळुंगे, सुरेश कट्टे,आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.शरदचंद्रजी पवार पुढे बोलताना म्हणाले की,मंगळवेढेकरांनी आतापर्यंत राष्ट्रवादीला भरभरून प्रेम दिले आहे, इथून पुढेही असेच इथून पुढच्या काळात ही अशीच भरभरून प्रेम द्यावे माझ्यासोबत अनेक लोकांनी काम केले आहे .    
           
     मंगळवेढ्यातील अनेक प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहेत त्यासाठी आपण अभिजीत पाटलांच्या पाठीमागे खंबीरपणे राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
    खा.शरदचंद्रजी पवार यांचा दि.13/08/2023 मंगळवेढा येथे दुपारी १२ वाजता माचाणूर चौक येथे स्वागत व तिथून (शेतकरी हाॅटेल पासून) रॅली काढण्यात आली. तसेच मंगळवेढा शहरा लगत पहिल्या ब्रीज पासून बोराळ नाक्यापासून दामाजी चौकाकडे रवाना होऊन दामाजी चौक येथे आगमन होऊन जेसीबीने पुष्पवृष्टी करण्यात आली.शरदचंद्रजी पवार हे राहुल शहा यांच्या निवासस्थानी चहापान करून  भेट देऊन पुढील कार्यक्रमासाठी सांगोल्याकडे रवाना झाले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form