पंढरपूर येथे जागतिक छायाचित्र दिनानिमित्त "फोटोविश्व पुरस्कार" प्रदान
पंढरपूर प्रतिनिधी --
पंढरपूर फोटोग्राफर विकास मंचच्या वतीने जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून फोटोविश्व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये फोटोग्राफि क्षेत्रासाठी तब्बल 20 वर्षापेक्षा अधिक काळ पडद्यामागे राहून महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल सम्राट भाळवणकर , रविकरण जोशी, योगेश आराध्ये यांना यावर्षीचा फोटोविश्व पुरस्कार देऊन सन्मानित केले.
हा सोहळा उमेश मालक परिचारक, कल्याणरावजी काळे, अभिजीत आबा पाटील, दिलीप बापू धोत्रे, विजयसिंह दादा देशमुख व ज्येष्ठ फोटोग्राफर लाला काका खिस्ते, सुनील भाऊ उंबरे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित व तालुक्यातील असंख्य फोटोग्राफर बांधवांच्या उपस्थित पार पडला.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पंढरपूर फोटोग्राफर विकास मंचचे श्रीकांत लव्हेकर विनायक देवकर, बंडू स्वामी,आनंद गदगे,किशोर काकडे,राहुल घाडगे, आत्माराम चौरे, ओंकार आराध्ये, हरी सरवदे,सोमनाथ नागणे, श्रीनिवास बोधे,गणेश काशीद,उमेश झाडे,सुनील झरकर, आलीसागर तांबोळी, किरण गाडेकर, संजू गुरव, यांच्यासह बहुसंख्य फोटोग्राफर बांधवांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक फोटोग्राफर विकास मंचचे बशीर शेख यांनी केले तर सूत्रसंचालन रेखाताई चंद्रराव यांनी केले आणि आभार सचिन कुलकर्णी यांनी मानले.
Tags
सामाजिक