पंढरपूर प्रतिनिधी--
प्रोग्रेस येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रमुख पाहुणे बँक ऑफ महाराष्ट्र च्या शेतकी अधिकारी मोहिते मॅडम व नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र फुगारे ह्या मान्यवरांच्या हस्ते सावित्रीमाईचे फोटो पूजन व ध्वजारोहण चा कार्यक्रम संपन्न करण्यात आले.
त्यानंतर चिमुकल्यांची भाषणे, देशभक्तीपर गीते तसेच समाजामध्ये जनजागृती व्हावी यासाठी काही ड्रामे(नाटके) विद्यार्थ्यांनी सादर केले.तद्नंतर प्रमुख पाहुण्यांची भाषणे झाली त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे विशेष म्हणजे कार्यक्रमाचे सर्व अँकरिंग हे इयत्ता चौथीतील आरव आणि स्वराली यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी नेहरू युवा मंडळातर्फे देण्यात आलेल्या झाडांचे मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
Tags
शैक्षणिक