लाचेची मागणी करून तडजोडी अंती पंधरा हजार रुपये स्वीकारताना आरोपींवर कारवाई
पंढरपूर (प्रतिनिधी)
शहरातील उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे सेवेत असणाऱ्या लोकसेवक यांने दहा गुंठे जागेच्या व्यवहारासाठी वीस हजार रुपय लाचेची मागणी करून तडजोडी अंती पंधरा हजार रुपये स्वीकारताना आरोपी लोकसेवक १) आप्पासाहेब शिवाजी तोंडसे, वय ५६ वर्षे पद- नायब तहसिलदार नेमणूक उपविभागीय अधिकारी कार्यालय पंढरपूर, तसेच सदर लाच रक्कम खाजगी इसम २) आरोपी खाजगी इसम तुकाराम बाळकृष्ण कदम, वय ५९ वर्ष, व्यवसाय किराणा दुकान, रा. घर नंबर ११ गौतम विद्यालय समोर, पंढरपूर ता. पंढरपूर जि. सोलापूर 3) आरोपी खाजगी इसम सचिन विठ्ठल बुरांडे, ४६ वर्षे, रा. विट्ठलनगर, गौतम विद्यालय शेजारी, पंढरपूर ता. पंढरपूर जि. सोलापूर यांचेकडे देण्यास सांगून रक्कम स्विकारल्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस सत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार यांनी त्यांच्या शेताच्या शेजारील १० गुंठे शेतजमीन खरेदी केली असून, सदर शेत जमीन ही १० गुंठे असल्याने सदरच्या खरेदी करीता मा. उपविभागीय अधिकारी, उपविभाग पंढरपूर यांची परवानगी आवश्यक असते, सदर परवानगी मिळण्यासाठी यातील तक्रारदार यांनी मा. उपविभागीय अधिकारी कार्यालय उपविभाग पंढरपूर येथे प्रस्ताव सादर केला असून, सदरचा प्रस्ताव मा. उपविभागीय अधिकारी यांचेकडून मंजुर करून घेवून शेतजमीन खरेदीची परवानगी देण्याकरीता यातील लोकसेवक आप्पासाहेब शिवाजी तोडसे पद- नायब तहसिलदार नेमणूक उपविभागीय अधिकारी कार्यालय पंढरपूर यांनी तक्रारदार यांच्याकडे २० हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती १५ हजार रुपये लाच रक्कम खाजगी इसम तुकाराम बाळकृष्ण कदम यांचेकडे देण्यास सांगीतली. त्यावेळी सदरची लाच रक्कम तुकाराम बाळकृष्ण कदम यांनी स्वीकारून ती सचिन विठ्ठल बुरांडे यांचेकडे दिली असता सचिन बुरांडे यांनी स्वीकारली असून संबंधित आरोपींना रंगेहात पकडण्यात आले आहे.
सदर कारवाई अमोल तांबे, पोलीस अधिक्षक, एसीबी पुणे, डॉ. शीतल जानवे / खराडे, अप्पर पोलीस अधीक्षक, एसीबी पुणे. तसेच पर्यवेक्षण अधिकारी गणेश कुंभार, पोलीस उपअधीक्षक एसीबी सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली. यासाठी सापळा पथकामध्ये सदरची कारवाई उमाकांत महाडिक, पोलीस निरीक्षक, एसीबी, सोलापूर, पोलीस अंमलदार- पोना शिरीषकुमार सोनवणे, पोना अतुल पाडगे, पोकॉ सलिम मुल्ला, पोह / राहुल गायकवाड, सर्व नेमणूक एसीबी सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
Tags
क्राईम न्यूज