पंढरपूर प्रतिनिधी--
पंढरपूर शहरात अत्यंत गाजलेली, बहुचर्चित, लोक ज्याची आतुरतेने वाट पाहतात, अशी १४ ऑगस्टची म्हणजे अखंड हिंदुस्थान दिनाची भव्य मशाल मिरवणुक प्रतिवर्षीप्रमाणे हिंदुसभेच्या पुढाकाराने व विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या सहकार्याने ह्याही वर्षी मोठ्या प्रमाणात, उत्साहात साजरी होणार आहे....
*सोमवार दिनांक १४ ऑगस्ट, २०२३ सायंकाळी ८.०० वाजता क्रांतिवीर वसंतदादा बडवे यांच्या पुतळ्यापासून निघून संपूर्ण प्रदक्षिणा मार्गाने हिंदुह्रदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यापाशी जाऊन तेथे सर्व राष्ट्रवीरांना स्मरून अखंड हिंदुस्थानाची प्रतिज्ञापूर्वक शपथ घेतली जाईल.
सर्व देव-देश-धर्म हिंदुराष्ट्रप्रेमींना संपूर्ण कार्यक्रमांस उपस्थित राहण्याचे कळकळीचे आवाहन पंढरपूर हिंदुसभेचे अध्यक्ष श्री. बाळ डिंगरे यांचेवतीने करण्यांत येत आहे.