पंढरपूर प्रतिनिधी--
नुकत्याच घेण्यात आलेल्या गुरुकुल शांतिनिकेतन विद्यालय कोर्टी येथील तालुकास्तरीय १९ वर्षाखाली मुलांच्या कबड्डी स्पर्धेत एमआयटी ज्युनिअर कॉलेज वाखरी संघाने दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी मिळवून घवघवीत यश संपादन केले.
या स्पर्धेसाठी तालुक्यातून सुमारे वीस शाळांनी सहभाग नोंदवला तसेच स्पर्धेसाठी पंच म्हणून चेतन धनवडे सर, गणेश बागल सर, तालुका क्रीडा समन्वयक मोहन यादव सर, पवार सर यांनी काम पाहिले.तर विजयी संघ व सहभागी विद्यार्थी पुढीलप्रमाणे ऋषिकेश सरगर ,विपुल घोडके, यश शेळके ,ओम खत्री ,शिवराज पाटील,यश इंगोले ,गणेश गडदे ,सागर शिंदे ,रोहन इंगोले ,सुरेश शिनगारे ,रोहित खाडे अमर सस्ते या विजयी संघाचे एमआयटीच्या प्राचार्या कार्तिश्वरी मॅडम यांनी अभिनंदन केले तसेच कॉलेजच्या क्रीडा शिक्षिका सौ अस्मिता घोलप यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले
Tags
क्रिडा वार्ता