पंढरपूर प्रतिनिधी ---
भटके विमुक्त व आदिवासी जातीमधील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि लाभ देण्यासाठी विशेष शिबीर आयोजन केले आहे. या शिबिराचे आयोजन दि. 11 व 12 मार्च 2024 रोजी जुनी वडार गल्ली, समाज मंदीर, पंढरपूर येथे केले असुन नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसिलदार सचिन लंगोटे यांनी केले आहे.
या समाजातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळण्यासाठी प्रामुख्याने जन्म दाखला, आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, शिधापत्रिका, आयुष्यमान भारत आरोग्य पत्रिका, जात प्रमाणपत्र यांची गरज असते ते मिळताना विविध समस्या व अडचणींचा सामना करावा लागतो. या अडचणी सोडविण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, वृध्द अवस्था पेन्शन योजना,आयुष्यमान भारत कार्ड, वयाचे प्रमाणपत्र, विधवा पेन्शन तसेच विविध दाखले देण्यात येणार आहेत. या शिबिरास संबधित विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. तसेच लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व मान्यवरही उपस्थित आहेत. तरी जास्तीत-जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसिलदार लंगोटे यांनी केले आहे.
00000000
Tags
प्रशासन वार्ता