पंढरपूर प्रतिनिधी ---
रेल्वे ग्राउंड पंढरपूर येथे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसा
निमित्त "भैरवनाथ शुगर चषक २०२४" चे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक श्याम गोगाव व वैभव बडवे यांनी दिली.
सदर भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा श्री अनिल दादा सावंत मित्र मंडळ, पंढरपूर - मंगळवेढा यांच्या वतीने दिनांक १३ मार्च रोजी सुरू होणार असून या स्पर्धेतील प्रथम विजेत्यास १ लाख ३१ हजाराचे तर द्वितीय क्रमांकास ७५ हजार रुपये व तृतीय क्रमांक ४१ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दिनांक १३ ते १७ मार्च २०२४ दरम्यान असून सर्व क्रिकेट प्रेमी यांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान संयोजक यांच्या वतीने करण्यात आले आहे.
Tags
राजकीय वार्ता