नाझरे प्रतिनिधी---
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाकडून सन 2021 ते 22 आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार वझरे तालुका सांगोला येथील लतिका शिवाजी महामुनी यांना प्रदान करण्यात आला असून, जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या शुभहस्ते व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनूर कर, प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, मुख्य लेखा वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या उपस्थितीत मानपत्र, ट्रॉफी देऊन महामुनी यांना सन्मानित करण्यात आले आहे.
लतिका महामुनी यांच्या 23 वर्षे सेवेच्या कार्याची दखल घेण्यात आली त्यामुळे त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी गणेश कस्तुरे, अंबिका महामुनी, कोमल महामुनी, गंगुबाई पाटील, संगीता शिनगारे, ज्योती रेड्डी इत्यादी उपस्थित होत्या. तर सुपरवायझर महालक्ष्मी देशमुख, सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांनी महामुनी यांचे अभिनंदन केले आहे.
Tags
शैक्षणिक वार्ता