शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक; १ मे २०२४ नंतर जन्मलेल्यांसाठी सक्ती...

मुंबई प्रतिनिधी ---
शासकीय कागदपत्रांवर उमेदवाराचे नाव त्यानंतर आईचे नाव, वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव असा क्रम नोंदविण्याचे बंधनकारक करणारा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

१ मे २०२४ रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंद बालकाचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरूपात सर्व शैक्षणिक कागदपत्रे, महसूली दस्तऐवज, वेतन चिठ्ठी, सेवापुस्तक, विविध परीक्षांच्या अर्जाचे नमुने इत्यादी शासकीय दस्तऐवजामध्ये बंधनकारक करण्यास मान्यता देण्यात आली आहे. १ मे २०२४ नंतरच जन्मलेल्यांसाठीच आईचे नाव बंधनकारक असेल. वेगळया स्तभांत नोंद करता येणार नाही.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form