मोहोळ प्रतिनिधी ---
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा व मोहोळ तालुका महिला पदाधिकारी निवडीचे पत्र आमदार यशवंत (तात्या)माने यांच्या हस्ते मोहोळ येथे कार्यक्रमात
देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महिला जिल्हाध्यक्षा वर्षाराणी शिंदे,जिल्हा कार्याध्यक्ष ज्योस्ना पाटील,उत्तर सोलापूर कार्याध्यक्षा उज्ज्वला पाटील,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मोहोळ तालुका अध्यक्ष प्रकाश भाऊ चवरे यांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले.
निवडी करण्यात आलेल्या महिला पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
जिल्हा उपाध्यक्ष कल्पना खंदारे,जिल्हा उपाध्यक्ष नगरबाई चवरे,जिल्हा सचिव कामिनी चोरमले,जिल्हा सहसचिव रशीदा शेख,जिल्हा चिटणीस सिंधुताई वाघमारे,जिल्हा सरचिटणीस संगीता पवार,मोहोळ तालुकाध्यक्ष शुभांगी लंबे,मोहोळ शहरअध्यक्षा यशोदा कांबळे,मोहोळ तालुका कार्याध्यक्ष स्मिता कोकणे,उत्तर सोलापूर तालुका कार्याध्यक्ष विजया सावंत,मोहोळ तालुका कार्याध्यक्ष सुरेखा बाबर,उत्तर सोलापूर तालुका उपाध्यक्ष नयना तोडकरी,लक्ष्मी हांडे यांच्या निवडी करण्यात आल्या.
Tags
राजकीय वार्ता