माझा हक्क, माझी सुरक्षा... महिला दिनानिमित्त हिंदवी महिला प्रतिष्ठानच्या वतीने आगळावेगळा उपक्रम...


पंढरपूर प्रतिनिधी--
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या समोर जागतिक महिला दिनानिमित्त हिंदवी महिला प्रतिष्ठानच्या वतीने माझा हक्क माझी सुरक्षा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना राशी मोहिते म्हणाले की, आज महिला दिनानिमित्त महिलांचे हक्क व संरक्षण हा कार्यक्रम आयोजित केला आहे. महिलांवर होणारे अत्याचार हुंडाबळी, लहान मुलीवर होणारे अत्याचार, मानसिक त्रास यांच्या विरोधात आम्ही काम करीत आहोत तसेच सामाजिक, राजकीय, कौटुंबिक प्रतिष्ठा महिलांना मिळाली पाहिजे यासाठी समाजातील सर्व महिलां नी एकत्र आले पाहिजे न घाबरता धाडसाने आलेल्या प्रसंगाला सामोरे जावे.तसेच
महिलांनी,मुलीनी, युवतीनी स्वसंरक्षण व महिलाचे हक्क याबाबत जागरूक राहिले पाहिजे. महिलांना समाजात पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याची संधी मिळाली पाहिजे,आज विविध क्षेत्रात महिला मोठ्या उत्साहाने काम करत असताना पाहतो परंतु बरेच वेळेस हा देखावा समाजात  दाखविली जातो.यासाठी महिलांनी सजक व सतर्क राहणे आवश्यक आहे.
 यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महिला, युवती व लहान मुलींनी आपल्या हातात विविध प्रकारचे संदेश फलक घेऊन आले होते, याप्रसंगी हिंदवी महिला प्रतिष्ठानच्या सदस्या संगिता साबळे, किर्ती साबळे, शिवंशा साबळे, राशी मोहिते, सिद्धी साबळे, ज्योती पाटील,माया डोंबाळे, अनुराधा वाघमारे, अमृता बाबर, छाया वाघमारे,प्रतिभा लोणारी, दिव्या लोणारी झानेश्वरी डोंबाळे, सलोनी चौधरी आदी महिला उपस्थित होत्या.

*चौकट*

हिंदवी महिला प्रतिष्ठान हि संस्था महिला, युवती, मुलीच्या न्याय, हक्कासाठी कार्य करते आज महिला दिनानिमित्त आम्ही माझा हक्क,माझी सुरक्षा हा उपक्रम राबविण्यात आला आहे. १५ ऑगस्ट २०११ पासून आमचे कार्य चालू आहे आम्ही महिलांना विविध प्रकारचे समस्या सोडविण्यासाठी मदत करतो तसेच रोजगार, स्वावलंबी जीवन जगण्याची प्रेरणा देतो. कौटुंबिक, सामाजिक, राजकीय जीवनात धाडसाने व स्वयंस्फूर्तीने यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करतो.दिंनाक १६ मार्च २०२४ रोजी आम्ही संस्थेच्या वतीने कार्यक्रम आयोजित केले आहे यामध्ये महिलांच्या विविध कला गुणांना जपणे व वाव देणे तसेच कौटुंबिक जीवनात असताना जोपासलेले खंद व राहिलेल्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी  महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. महिलांनी एकत्रित येऊन एक आनंद सोहळा साजरा करावा तसेच येथे विविध मान्यवर मंडळी यांच्या कडून विविध विषयांवर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे सदर कार्यक्रमास महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन हिंदवी महिला प्रतिष्ठान सर्व महिला पदाधिकारी व सदस्य यांनी केले आहे.

सौ.संगिता साबळे
हिंदवी महिला प्रतिष्ठान, पंढरपूर

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form