पंढरपूर प्रतिनिधी ---
भाजपकडून बोगस दाखलेवाला उमेदवार नको अशी निवेदनाद्वारे मागणी विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे संस्थापक माजी नगरसेवक डि राज सर्वगोड यांनी केले तसेच केंद्रीय न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल हे सोलापूर येथे आले असता विविध संघटनाच्यावतीने देखील निवेदन देत करण्यात आली आहे.
लोकसभा अनुसूचीत मतदार संघातून भाजपकडून उमेदवार कोण याची मोठी उत्सुकता मतदार संघाला लागून राहिली आहे. सोलापूर लोकसभा मतदार संघाचे भाजपचे विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेवर शिवाचार्य स्वामी यांची कारकीर्द फारशी प्रभावी राहिली नाही, त्यामुळे या मतदार संघातील प्रश्न फारसे प्रभावीपणे मांडले गेले नाहीत विकास खुंटला अशीच भावना जनमानसात सातत्त्याने व्यक्त होत आली आहे. अशातच त्यांच्या अनुसूचित जातीच्या दाखवल्यावरून वाद उत्पन्न झाला, यात पुढे कोर्टबाजी देखील झाली. मात्र यामुळे या मतदार संघातील अनुसूचित जमातीच्या मतदार नागरिकांमध्ये मोठी नाराजी दिसून येत आली आहे.
निवडणूक लढविण्यासाठी असे बोगस दाखले काढून जर अनुसुचित जाती उमेदवार पुढे आणले जात असतील तर तो मोठा अन्याय असल्याचेही म्हटले गेले. यातूनच आता भाजपकडून मतदार सोलापूर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देताना सामाजिक दृष्टयामागसलेपणाचे चटके सहन केलेल्या अनुसूचित जाती उमेदवारासच भाजपने उमेदवारी दयावी अशी मागणी केंद्रीय न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल हे सोलापूर येथे आले असता विविध संघटनाच्यावतीने निवेदन देत करण्यात आली आहे. यावेळी सोलापूर लोकसभा समन्वयक माजी खासदार अमर साबळे हेही उपस्थित होते. या बाबत विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे संस्थापक माजी नगरसेवक डि राज सर्वगोड यांनी माहिती दिली.
Tags
राजकीय वार्ता