चळे प्रतिनिधी ---
नेहरू युवा मंडळ व कोंढारकी गावचे ग्रामस्थ यांच्या वतीने आनंद मोरे यांची रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा जेष्ठ नागरिक व मार्गदर्शक आप्पासो दांडगे यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी रणदिवे विस्तार अधिकारी यांनी मार्गदर्शन करताना शिक्षण हे जीवनात परिवर्तन घडवणारे माध्यमा आहे. शालेय जीवनात संस्कार, शिस्तबद्ध जिवन पद्धत तसेच ज्ञान साधना जोपासना विद्यार्थ्यांनी केली पाहिजे, शाळेतील विद्यार्थी घडवण्यासाठी पालकांनी विशेष लक्ष दिले तर गावात उच्च दर्जाचे अधिकारी, डॉक्टर, वकील, समाजसेवक, राजकीय प्रतिनिधी, कर्तृत्ववान शेतकरी, व्यापारी, कुशल संघटक घडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी विस्तार अधिकारी रणदिवे, पांडुरंग सहकारी साखर कारखाना संचालक सुदाम मोरे, नेहरू युवा मंडळ अध्यक्ष राहुल नागणे, सचिव राजेंद्र फुगारे, सर्व सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन सिध्देश्वर दांडगे यांनी केले.
Tags
सामाजिक वार्ता