पंढरपूर तालुका पोलिसांची वाळू माफिया विरोधात मोठी कारवाई

पंढरपूर प्रतिनिधी---
पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू माफिया विरुद्ध मोठी कारवाई सदर कारवाई मध्ये दोन पिकप गाड्या जप्त तसेच दोन ब्रास वाळू जप्त एकूण १० लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर यांनी दिली.

सदर कारवाई मौजे शेगावदुमाला ता-पंढरपुर येथील स्मशानभुमी जवळील असलेल्या भिमानदीपात्रातुन अवैधरित्या, विनापरवाना, पर्यावरणाचा -हास होईल हे माहित असताना सदर इसमाने वाळू चोरुन वाहनांमध्ये भरत असताना पोलिस आले असता पिकअप दोन वाहने रस्त्यावर सोडुन पळुन गेले म्हणून अंगद दुर्योधन चव्हाण व महेश अरूण आटकळे रा. शेगांव दुमाला ता. पंढरपूर यांचे विरोधात सरकार तर्फे भा.दं.वि.कलम ३७९,सह गौण खनिज कायदा कलम ४(१),४(क)१,२१प्रमाणेकायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

सदरची कारवाई  पोलीस अधीक्षक  शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक  प्रीतम यावलकर, एस डी पी ओ अर्जुन भोसले, यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर, ए एस आय तोंडले, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील मोरे, गजानन माळी, पोलीस कॉन्स्टेबल राहुल जगताप, नलावडे, यांच्या पथकाने केली सदर कारवाई रात्रीच्या वेळी केली

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form