सोलापूर (प्रतिनिधी):-
पुस्तकांने मन आणि मस्तकासह पुढच्या पिढ्याही सुधारत असल्याने वाचन चळवळ घराघरापर्यंत पोहचविणे गरजेचे असल्याचे मत ग्रंथालय संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष विजय कोलते यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून व्यक्त केले.
उच्च व तंत्रशिक्षण, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकार कार्यालय, सोलापूर व दयानंद शिक्षण संस्था, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सोलापूर ग्रंथोत्सव 2023 कार्यक्रमाप्रसंगी कोलते हे बोलत होते.
प्रारंभी सकाळी दयानंद काशीराम आसावा प्रशाला येथून मुख्याध्यापक जितेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथदिंडीस सुरुवात करण्यात आली. या ग्रंथदिंडीत दयानंद काशीराम आसावा प्रशाला, हंचाटे विद्यालय, ज्ञानसंपदा प्रशाला, सोलापूर लाटी काटी असोसिएशन व वारकरी मंडळ यांनी सहभाग घेतला होता. यावेळी मुला-मुलींनी लेझीम, लाटीकाटी, ढोल पथकांनी आपापले खेळ साधर करून जाणाऱ्या येणाऱ्यांची नजर वळवून घेत होते.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली महाराष्ट्र गीत व स्वामी रंगनाथन यांच्या प्रतिमेपूजन आणि दीप प्रज्वलनाने सुरुवात झाली.
पुढे बोलताना कोलते म्हणाले की, सुजाण समाज घडविण्यासाठी वाचन चळवळ तळागाळापर्यंत पोहोचली पाहीजे त्यासाठीच ग्रंथालय सक्षम करण गरजेच आहे.
माध्यमिकचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप आपल्या उद्घाटनपर भाषणात म्हाणाले की, विद्यार्थी ज्ञानपूर्ण व सक्षम करावयाचा असेल तर ग्रंथालय चळवळ व शाळांमध्ये चांगला समन्वय साधला पाहीजे. त्यासाठी आपण लवकरच ग्रंथालय चळवळीतील व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची एक बैठक बोलावू.
जिल्हा ग्रंथालय कार्यालय अधिकारी संतोष जाधव आपल्या प्रास्ताविकात बोलताना म्हणले की, सोलापूर जिल्ह्यातील ग्रंथालय चळवळ व ग्रंथालये नागरिकांना सेवा देण्यास आग्रेसर आहेत.
कार्यक्रमाचे उद्घाटन माध्यमिकचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय कोलते, सहाय्यक ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले, साहित्यिक श्रीमती श्रुती वडकबाळकर, दयानंद महाविद्यालय शिक्षण शास्त्रचे प्राचार्य श्रीरंग क्षीरसागर, दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय प्राचार्य विजयकुमार उबाळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सोलापूर श्री संतोष जाधव सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजयकुमार पवार, कवी मारुती कटकधोंड,ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, हरिदास रणदिवे, पद्माकर कुलकर्णी, विलास शहा, जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष पांडुरंग सुरवसे, जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक प्रकाश शिंदे, विनोद गायकवाड,संघाचे कार्यवाहक साहेबराव शिंदे, अनसर शेख, भीमाशंकर बिराजदार, सिध्दलिंगेश्वर बेडगणूर आदी मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रवीण देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा ग्रंथालय निरीक्षक प्रमोद पाटील यांनी केले.
सदर कार्यक्रम यशस्वी नीटनेटका करण्याचे काम जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सोलापूर येथील सहाय्यक प्रदीप गाडे, महेश कुलकर्णी, जगदीश परमशेट्टी, ज्योतीराम चांगभले, सदाशिव बेगडे व नरसिंह मिसालोलू यांनी अथक परिश्रम घेतली.
Tags
सामाजिक वार्ता