ऐन उन्हाळ्यात पहिल्यांदाच माण नदीत येणार टेंभूचे पाणी
सांगोला (प्रतिनिधी): दुष्काळग्रस्त तालुक्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी टेंभू योजनेतून आवर्तन सुरू असून जुनोनी, हातीद, पाचेगांव, जुजारपूर, हटकर मंगेवाडी, राजुरी या गावातील तलाव, बंधारे पूर्ण क्षमतेने भरून देण्यात येणार आहेत. तसेच मार्चअखेर टेंभू योजनेच्या पाण्याने खवासपूर ते मेथवडे पर्यंतचे सर्व बंधारे पुरेशा पाण्याने भरून देण्यात येणार आहेत. टेंभूच्या आवर्तनाचे पाणी सर्व गावांना व्यवस्थित देऊन माण नदीवरील सर्व बंधारे भरण्याचे योग्य नियोजन करून पाणी सोडण्याच्या टेंभूच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.
टेंभू योजनेच्या उन्हाळी आवर्तनाचे नियोजन करण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील त्यांच्या कार्यालयात जलसंपदा अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीसाठी टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार, उपअभियंता गायकवाड, शाखा अभियंता महेश पाटील आदी उपस्थित होते. यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांनी टेंभू योजनेतून लाभक्षेत्रातील जुनोनी, हातीद, पाचेगांव जुजारपूर, हटकर मंगेवाडी, राजुरी या गावातील तलाव, बंधारे पूर्ण क्षमतेने भरून टेंभूचे माण नदीमध्ये पाणी सोडून खवासपूर ते मेथवडे पर्यंतचे सर्व बंधारे भरण्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना टेंभूच्या अधिकाऱ्यांना केल्या. कोणत्याही गावाला पाणी कमी पडू नये याची दक्षता घेण्याच्याही सूचना आमदार शहाजीबापू पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सूचनेची दखल घेत टेंभूच्या अधिकाऱ्यांनी टेंभू योजनेच्या पाण्याने जुनोनी, हातीद, पाचेगांव जुजारपूर, हटकर मंगेवाडी, राजुरी या गावातील तलाव, बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्याचे काम सुरू आहे. उपलब्ध पाण्यानुसार जुनोनी तलाव ओव्हर फ्लो करून त्या खालील असणारे ओढयावरील बंधाऱ्यात पुरेसे पाणी देण्याचे नियोजन करणेत आले आहे. तसेच ग्रामस्थांनी परस्पर कालव्यावरील आऊटलेट ओपन करू नये अन्यथा पाणी देण्याच्या नियोजनात बदल होवून वेळ होवू शकतो. त्यासाठी टेंभूचे आवर्तन पूर्ण क्षमतेने भरून देत असताना सहकार्य करण्यासाठी जुनोनी, हातीद, पाचेगांव या गावातील सरपंचांना टेंभूच्या कार्यालयाने पत्रव्यवहार केला आहे.
तसेच मार्चअखेर टेंभू योजनेच्या पाण्याने खवासपूर ते मेथवडे पर्यंतचे सर्व बंधारे पुरेशा पाण्याने भरून देण्यात येणार आहेत. टेंभूच्या आवर्तनाचे पाणी सर्व गावांना व्यवस्थित देऊन माण नदीवरील सर्व बंधारे भरण्याचे योग्य नियोजन करून पाणी सोडण्याच्या सूचना आमदार शहाजीबापू पाटील यांनी टेंभूच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात टेंभूचे पाणी मिळाल्याने पिण्याचा पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने जुनोनी, हातीद, पाचेगांव जुजारपूर, हटकर मंगेवाडी, राजुरी येथील तलावाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसह माणनदी नदीकाठावरील सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे.
Tags
राजकीय वार्ता