संग्रामनगर ग्रामपंचायतीच्या महिला सफाई कामगारांचा साडी चोळी देऊन महिला दिन साजरा करण्यात आला...

अकलूज (संजय लोहकरे)
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संग्रामनगर येथे जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांच्या वतीने ग्रामपंचायतीच्या महिला सफाई कामगारांचा माळशिरस तालुका जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने ग्रामपंचायतीच्या महिला सफाई कामगारांचा साडी चोळी देऊन पुष्पहार घालून सन्मान करू एक वेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा केला आहे.
           
 ८ मार्च जागतिक महिला दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असताना माळशिरस तालुका जिजाऊ ब्रिगेड सोलापूर पंढरपूर विभागाच्या वतीने वर्षभर रस्त्यावरील साफसफाई करणा-या महिला कामगारांचा प्रदेश सदस्या शिवमती आक्काताई माने,प्रदेश सदस्या शिवमती प्रियाताई नागणे व  माळशिरस तालुका जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा शिवमती मनोरमा लावंड यांच्या हस्ते साडी चोळी देऊन सत्कार करण्यात आला.

या पुर्वी हि माळशिरस तालुका जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने महिलांच्या सन्मान करण्यात आला आहे व विविध उपक्रम राबविले आहेत.यामध्ये पोलीस खात्यातील अहोरात्र जनतेची सेवा करणाऱ्या महिला पोलीसांचा सन्मान करण्यात आला आहे,ऊसतोड महिला मजूर व त्यांच्या मुलांना कपडे वाटप खाऊ वाटप करण्यात आले‌.अनाथ आश्रमात अन्नधान्य,कपडे आणि आर्थिक मदत केलेली आहे,ज्या स्त्रियांनी आपली किडनी दान करून दुस-यांना जीवदान दिलेले आहे अशा महिलांना सन्मान करण्यात आला आहे.कोरोनाच्या काळामध्ये रूग्णांच्या आरोग्याची सेवा करत काळजी घेतलेल्या सर्व वैद्यकीय क्षेत्रातल्या सर्व परिचारिका यांचा सन्मान करण्यात आला आहे.चिपळूण येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला होता.

 यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या अकलुज शहर अध्यक्ष शिवमती शुभांगी क्षिरसागर,
शहर कार्याध्यक्ष शिवमती शारदा चव्हाण,संघटक शिवमती कल्पना चव्हाण,संघटक शिवमती सुवर्णा क्षिररसागर,संघटक शिवमती आशा सावंत,शिवमती सुवर्णा गोरवे,जिजाऊ ब्रिगेडच्या प्रसिध्दी प्रमुख शिवमती वंदना पवार, शिवमती संगीता जगदाळे शिवमती विजया शिंदे,शिवमती संगीता मगर,शिवमती सुनिता नडगिरे,शिवमती सुजाता लावंड, शिवमती रंजना लावंड उपस्थित होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form