वेणुनगर प्रतिनिधी --
वेणुनगर-गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व धुरंधर राष्ट्रीय नेते भारताचे माजी उपपंतप्रधान कै. यशवंतराव चव्हाण यांचे १११ व्या जयंतीनिमित्त कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांचे मार्गदर्शनानुसार कारखान्याचे संचालक श्री संभाजी ज्ञानोबा भोसले यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे विधीपूर्वक पुजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाप्रसंगी कारखान्याचे संचालक सर्वश्री सुरेश भुसे, कालिदास साळुंखे, तज्ञ संचालक सर्वश्री दशरथ जाधव, अंगद चिखलकर, अशोक तोंडले, गणेश ननवरे प्र. कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड, सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते, सभासद, कंत्राटदार, व्यापारी व हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.
Tags
सहकार्य वार्ता