पंढरपूर येथील बैठकीत राष्ट्रवादीचे दिग्गज नेते मंडळींची ढाम मागणी
पंढरपूर प्रतिनिधी---
माढा लोकसभा मतदार संघातून महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसला जागा मिळावी.या मागणीसाठी पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली. यावेळी माढा लोकसभा मतदार संघातील सर्व दिग्गज प्रमुख नेते मंडळी उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार रामराजे निंबाळकर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की लोकसभा निवडणुक लवकरच जाहीर होणार आहेत यासाठी माढा लोकसभा मतदार संघात सोलापूरचे चार व सातारा दोन असे मतदार संघ आहे तसेच ६ मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची मुंबई येथे बैठक आयोजित केली असून या बैठकीत माढा लोकसभा मतदार संघ हा राष्ट्रवादीसाठी मिळावी अशी मागणी करण्याचे आज पंढरपूर येथील बैठकीत ठरले आहे.सदर बैठक ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असून यावेळी आम्ही सदर मागणी मतदार संघाच्या वतीने करीत आहोत.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना ते म्हणाले लोकशाही मार्गाने आम्ही सदर मागणी केली असून सध्या युतीची सत्ता असुन यामध्ये जो काही निर्णय होईल तो आम्हांस मान्य असणार आहे तसेच यासर्व राजकीय वाटाघाटी तसेच त्यावेळी वरीष्ठ आदेश देतील तसे आम्ही पक्षाचे काम निष्ठेने करणार आहोत.
या बैठकीस रामराजे नाईक निंबाळकर, दिपक साळुंखे, कल्याणराव काळे,, रणजितसिंह शिंदे, संजीवराजे नाईक निंबाळकर,आ. दिपक चव्हाण, यांचेसह सर्व भागातील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते.यामुळे भाजपच्या उमेदवारीला आतापासूनच खो बसत असल्याचे दिसून येत आहे.
Tags
राजकीय वार्ता