पंढरपूर प्रतिनिधी --
पंढरपूर येथील युवा मुद्रक संस्थेच्या वतीने आज जागतिक मुद्रण दिन साजरा करण्यात आला पंढरपूर येथे पंढरपूर युवा मुद्रक संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन,व जोहान्स गुटेनबर्ग यांच्या प्रतिमेचे पुजन शिव प्रिंटर्सचे ज्येष्ठ मुद्रक नंदकुमार माणिक साळुंखे यांचे शुभहस्ते व श्री प्रिंटर्स चे मालक श्रीरंग जाधव ,युवा मुद्रक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्ताजीराव पाटील यांचे शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस चालू वर्षात मुद्रक उदयसिंह परदेशी, व मुद्रिका मानसीताई केसकर व ज्ञात अज्ञात मुद्रकांचे निधन झाले त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
दरवर्षी 24 फेब्रुवारी रोजी होणारा जागतिक मुद्रण होणारा कार्यक्रम महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे अधिवेशन सोलापूर येथे होते. अध्यक्ष बाळासाहेब आंबेकर यांनी सर्व मुद्रक संघाना यांची कल्पना दिली होती की सर्वांनी एकाच दिवशी कार्यक्रम न घेता तारखेत थोडा बदल करून कार्यक्रम घ्यावा असे सुचिवले होते त्याप्रमाणे अध्यक्ष दत्ताजीराव पाटील यांनी हा कार्यक्रम 5 मार्च रोजी घेण्याचे सर्वांनुमते ठरविण्यात आले.
सदर प्रसंगी बोलताना मुद्रक मंदार केसकर यांनी दि.24 फेब्रुवारी म्हणजे आपल्या मुद्रक बांधवाचा विशेष दिवस या दिवशी जर मुद्रण कलेची क्रांती झाली नसती तर आज हा सोहळा पार पडला नसता.सर जोहान्स गुटेनबर्ग यानी मुद्रणात क्रांती घडवून आणून साऱ्या मुद्रण या व्यवसायिकांना एक प्रकारे सन्मानाचा,उदरनिर्वाहाची सोय करून दिली. आज आपण जे आहोत ते त्यांच्या मुळेच असे म्हणणे वावगे ठरणार नाही. गेल्या काही दिवसात प्रिंटीग प्रेस मध्ये अनेक बदल होत गेले. रोज नवीन काहीतरी येत आहे. सकाळी दिलेला मॅटर संध्याकाळी प्रिंटीग करून मिळू लागला.तासाभरात ग्राहकाला त्याचे प्रूफ मिळू लागले. सांगितलेल्रा वेळे च्या अगोदरच छपाई मिळू लागली इतके बदल झाले की प्रिंटीग प्रेस च्या मालकाला व ग्राहकालाही ते कळले नाहीत. ग्राहकाची मनस्थिती बिघडली.. जिथे काम लवकर मिळेल तिकडे त्याचा ओढा वाढला, कॉम्पुटरमुळे छपाई मध्ये सुबकता आली. आकर्षकता आली याचे सर्व श्रेय या गुटेनबर्गला जाते. त्यामुळे हा दिवस जागतिक मुद्रण दिन म्हणून साजरा केला जातो.
यावेळी मंदार केसकर म्हणाले की एका साधा कोर्या कागदावर मुद्रा उमटवून कागद शहाणा करणारे आपण मुद्रक आहोत. आज मुद्रणाशिवाय कुठलीच गोष्ट साध्य होत नाही. जुना काळातील शिलालेखापासून ते आता थ्रीडी पर्यंत असे अत्याधुनिक तंत्रज्ञान आले आहे. आपण विचार करू शकत नाही इतके मुद्रण प्रगत झाले आहे. आपल्या पंढरपूरातील जवळ जवळ सगळेच मुद्रक जुन्या काळातील आहेत. आपला भाग तसा ग्रामीण मध्ये मोडतोय. जुन्या पिढीतील अनेक मुद्रकांनी एकमेकास सहकार्य केले व एकोपा ठेवला होता.त्याच पध्दतीने दत्ता पाटील यांनी सर्वांना एकत्र केले आहे.हीच परपंरा आपण एकमेकांनी जोपासली पाहिजे.
सदर प्रसंगी नंदकुमार साळुंखे यांचा सत्कार अध्यक्ष दत्ता पाटील यांनी तर व श्रीरंग जाधव यांचा सत्कार उपाध्यक्ष बबन सुरवसे यांनी केला श्रीरंग जाधव यांनी सर्व मुद्रकांनी मासिक मिटींग घ्यावी ती प्रत्येक मुद्रकांच्या घरी घ्यावी म्हणजे मुद्रकांच्या समस्या व अडचणी समजतील व त्या अडचणी सोडविण्यास मदत होईल.
पंढरपूर युवा मुद्रक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दत्ताजीराव पाटील यांचा वाढदिवस यांच दिवशी असल्याने सर्वच मुद्रकांनी त्याचा वाढदिवस केक कापून व सत्कार करून केला. या कार्यक्रमासाठी मुद्रक किसनगोपाल भट्टड यांनी आपला हॉल दिला, त्यानंतर सर्वानी स्नेहभोजन केले.
यावेळी उपस्थित सुरज कोठारी, गजानन कौलगी, श्रीनाथ साळुंखे, प्रदीप भोरकर, संजय खासनीस, सुधाकर भोसले, मकरंद वैद्य, मंदार केसकर, सौदागर चव्हाण, बबन सुरवसे,रमेश यादव,संजय यादव संतोष गोंजारी, अमोल चव्हाण, धनंजय उखळे, रामकृष्ण बीडकर, गणेश बागडे, विद्येंद्र मोरे,राजु काशीद इ.मुद्रक उपस्थित होते.
Tags
सामाजिक वार्ता