पंढरपूर प्रतिनिधी ---
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत धनंजय पाटील यांच्या संकल्पनेतून विठ्ठल प्रतिष्ठान,यांचे वतीने जागतिक महिला दिनानिमित्त सुप्रसिध्द अभिनेते आदेश बांदेकर यांचा खेळ मांडियेला कार्यक्रम दि.१०मार्च २४ रोजी सायंकाळी ६वा. रेल्वे मैदान, पंढरपूर येथे होणार असल्याची माहिती श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी दिली.
विठ्ठल प्रतिष्ठानच्या जागतिक महिला दिना निमित्त दैनंदिन जीवनात व्यस्त असलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा हेतुने कार्यक्रम होत आहे. महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांनाही आनंदाचे क्षण वेचता यावेत या अनुषंगाने महाराष्ट्रभर गाजत असलेले लाडके भाऊजी म्हणजेच आदेश बांदेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी पंढरपूर तालुक्यातील शेकडो माता-भगिनींनी कार्यक्रमात सहभागी होण्याचे अवाहन चेअरमन अभिजीत पाटील यांनी केले आहे.
Tags
सामाजिक वार्ता