कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन
सोलापूर प्रतिनिधी --
भारतीय मजदूर संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन ९ आणि १० मार्च २४ रोजी पंढरपूर येथील मनमाडकर सभागृह येथे होणार आहे. कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन होईल अशी माहिती संघाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अनिल ढुमणे यांनी आज सोलापूरात पत्रकार परिषदेत दिली.
९ मार्चला सकाळी १०.३० वाजता उद्घाटन होईल. प्रमुख वक्ते हिरण्यमय पंड्याजी हे उपस्थित राहणार आहेत.
या पत्रकार परिषदेस महामंत्री मोहन येणूरे, संघटनमंत्री श्रीपाद कुटासकर, कोषाध्यक्ष किरण मिलगीर, मदन कुलकर्णी, भारत तांबोळकर, सुधांशू रानडे, नागेश गुणके, गुरुराज कडगंची, रविकिरण मडोळी, अनिल बरगले, बाळासाहेब कुलकर्णी, अण्णा धुमाळ आदी उपस्थित होते.
Tags
सामाजिक वार्ता