सांघिक प्रयत्नातून सहकार शिरोमणी कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वी...कल्याणराव काळे :

कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता

 
भाळवणी प्रतिनिधी --
 यंदाचा गळीत हंगाम 2023-24 अतिशय आव्हानात्मक परस्थितीत सुरु झाला. कारखान्याचे संचालक मंडळ, ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार, तोडणी मजुर, शेती विभागाचे तसेच कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्या सांघिक प्रयत्नातुन यंदाचा हंगाम यशस्वी झाला असल्याचे प्रतिपादन सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी केले.

            कारखान्याच्या सन 2023-24 च्या 24 व्या गळीत हंगामाची सांगता समारंभात ते बोलत होते. कारखान्याचे उपाध्यक्ष भारत कोळेकर, कार्यकारी संचालक झुंजार आसबे व संचालक मंडळाची प्रमुख उपस्थिती होती. तत्पुर्वी ऊस वाहतुक ठेकेदार धनाजी मारुती कवडे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.सविताताई कवडे या उभयतांच्या शुभहस्ते श्रीसत्यनारायण महापुजा व काटा पुजन करण्यात आली. गळीत हंगामामध्ये जास्तीत-जास्त्‍ ऊस वाहतुक केलेल्या बैलगाडीवान, वाहन मालक, मुकादम यांचा सत्कार संचालकांच्या हस्ते  करण्यात आला.

            पुढे बोलताना कल्याणराव काळेसाहेब म्हणाले, कारखान्याचे ऊस पुरवठादार शेतकरी आणि ऊस तोडणी वाहतुक करणाऱ्या ठेकेदारांना न्याय देण्यासाठी संचालक मंडळाने ऊस बिले व तोडणी वाहतुक कमिशनसह बिले हंगाम सुरु झाल्यापासुन 10 दिवसात दिलेली आहेत. हंगामाच्या अंतिम टप्यातील उर्वरीत बिलेही लवकरच त्यांचे बँक खात्यावर जमा करण्यात येतील. यंदाच्या हंगामात कारखाना चालतो की नाही, अशी शंका सर्वत्र व्यक्त्‍ केली जात होती. मात्र सर्वांच्या सहकार्यामुळे हंगाम यशस्वी झाला. मात्र तोडणी वाहतुक यंत्रणे अभावी अपेक्षित गाळपाचे उद्दिष्ट गाठता आले नाही, याची खंत व्यवस्थापनाला आहे. कारखान्याचे संस्थापक स्व्.वसंतराव दादा काळे यांच्या आचार विचारांचा वारसा कार्यक्षेत्रातील सर्वच कार्यकर्त्यांकडून जपला जात असल्याबद्दल कल्याणराव काळे यांनी समाधान व्यक्त्‍ करुन पुढील गळीत हंगामाची जय्यत पुर्व तयारी करुन इतिहास निर्माण करु अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

तसेच चालु हंगामामध्ये 2,35,381 मे.टन ऊसाचे गळीत करुन, 9.22 टक्के साखर उताऱ्याने 2,00,700 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. डिस्टीलरी प्रकल्पामधुन आज अखेर 29,46,646 ब.लि. उपपदार्थाचे उत्पादन झाले असून, पुढील दोन महिने डिस्टीलरी प्रकल्प्‍ सुरु राहील याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच सहवीज निर्मिती प्रकल्पामध्युन 1,70,47,850 युनिट वीज निर्मिती करण्यात आली असून, 81,93,000 युनिट वीज निर्यात केली असल्याचे सांगितले.  

कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांनी स्वागत केले. रावसाहेब पवार यांनी सुत्रसंचालन केले तर आभार संचालक युवराज दगडे यांनी मानले.यावेळी कारखान्याचे संचालक मोहन नागटिळक, गोरख जाधव, आण्णा शिंदे, राजाराम पाटील, युवराज दगडे, नागेश फाटे, परमेश्वर लामकाने, जयसिंह देशमुख, संतोषकुमार भोसले, सुनिल सराटे, अमोल माने, अरुण नलवडे, माजी संचालक विलास जगदाळे, दिपक गवळी, इब्राहिम मुजावर, प्रगतशिल बागायतदार गोरख बागल, जनकल्याण हॉस्पीटलचे डॉ.सुधिर शिनगारे, राष्ट्रावादी काँग्रेसचे अरविंद जाधव, पंढरपूर तालुकाध्यक्ष अनिल नागटिळक, भाळवणीचे सरपंच रणजित जाधव, यशवत पतसंस्थेचे चेअरमन शहाजी साळुंखे, राजाभाऊ जगदाळे, नारायण शिंदे, कारखान्याचे डेप्यु.जन.मॅनेजर कैलास कदम, वर्क्स मॅनेजर जी.डी.घाडगे, डिस्टीलरी मॅनेजर (टेक) पी.डी.घोगरे, प्रोडक्श्न मॅनेजर व्ही.एस.तांबारे, मुख्य शेती अधिकारी अे.व्ही.गुळमकर, चिफ अकैंटंट बबन सोनवले, डेप्यु.चिफ अकौंटंट नवनाथ कौलगे, उप.शेती अधिकारी पी.आर.थोरात, सिव्हिल इंजिनिअर नानासाहेब काळे, को-जन मॅनेजर संभाजी डुबल, परचेस ऑफिसर सी.जे.कुंभार, मा.कामगार प्रतिनिधी बंडु पवार, हेडटाईम किपर संतोष काळे, केनयार्ड सुपरवायझर दिलीप काळे, सुरक्षा इनचार्ज मनसुब सय्यद, अधिकारी कर्मचारी तसेच वाहन चालक-मालक, मुकादम, बैलगाडीवान, ऊस उत्पादक सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form