सांगोला प्रतिनिधी ---
महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याचाच एक भाग म्हणून सांगोला नगरपरिषदेच्या वतीने शहरातील महिलांसाठी विविध स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले. यामध्ये पाककला स्पर्धा, होम मिनिस्टर यासारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक ५ मार्च रोजी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शहरातील ४४ स्पर्धकांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी, तालुका कृषी अधिकारी श्री. शिवाजीराव शिंदे, माजी नगराध्यक्षा सौ.राणीताई माने, श्रीम.शुभांगी पतंगे मॅडम यांनी कामकाज पाहिले. पाककला स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रीम.शुभांगी तेली, द्वितीय क्रमांक श्रीम. सरिता लिगाडे, तृतीय क्रमांक श्रीम. वैजयंता दौंडे यांचा तर उत्तेजनार्थ म्हणून श्रीम. कार्तिकी मडके, श्रीम. माधवी खडतरे व श्रीम. अरुणा लोखंडे यांचा क्रमांक आला. दि. ६ मार्च रोजी होम मिनिस्टर व बक्षीस वितरण इ. कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी होम मिनिस्टर या मजेदार खेळाच्या माध्यमातून तीन स्पर्धकांना पैठणी भेट देण्यात आली. सदर स्पवर्धेमध्येस प्रथम क्रमांक श्रीम.मनिषा हुंडेकरी, द्वितीय क्रमांक श्रीम.अरुणा लोखंडे, तृतीय क्रमांक श्रीम.सविता लोखंडे यांचा आला. लकी ड्रॉच्या माध्यमातून उपस्थितांना विविध बक्षिसांचे वाटप करण्यात आले. विजेत्या व उत्तेजनार्थ स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व बक्षीसाच्या रक्कमेच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोकनियुक्त माजी नगराध्यक्षा सौ. राणीताई माने, मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी , तालुका कृषी अधिकारी श्री. शिवाजीराव शिंदे, निवडणूक नायब तहसिलदार श्रीम.शुभांगी जाधव, कृषी अधिकारी (पं.स.) दिपाली शेंडे, माजी उपनगराध्यक्षा सौ. स्वातीताई मगर, माजी नगरसेविका सौ.छायाताई मेटकरी, माजी नगरसेविका सौ.सुनिता खडतरे, माजी नगरसेविका सौ.अनुराधा खडतरे, अध्यक्ष कर्तव्य शहरस्तर संघ श्रीम.सुनंदा घोंगडे, कार्यालयीन अधीक्षक श्री. स्वप्निल हाके हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अनुपमा गुळमिरे यांनी केले. सदरचे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कर निरीक्षक श्री.रोहित गाडे, सहा.प्रकल्प अधिकारी योगेश गंगाधरे, प्रतिभा कोरे, समुदाय संघटक बिराप्पा हाके, शरद थोरात, सौ.जयश्री खडतरे,सौ सारिका लोखंडे, सविता लोखंडे व नगरपरिषद कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
Tags
सामाजिक वार्ता