डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांचा जिल्हाध्यक्षपदाचा प्रभारी पदभार राहुल कौलगे पाटील यांच्याकडे येण्याची शक्यता....
सोलापूर प्रतिनिधी --
लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने टिळक भवन मुंबई येेथे सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये सोलापूर शहर व जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. यापूर्वी सोलापूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीने आ.प्रणितीताई शिंदे यांना उमेदवारी मिळण्यासाठी ठराव घेतला होता. त्या अनुषंगाने या मुंबईतील बैठकीमध्ये आमदार प्रणितीताई शिंदे यांचे नाव सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीने अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी यांच्याकडे एकमताने हायकमांडकडे पाठविण्यात आले. त्या अनुषंगाने आ.प्रणितीताई शिंदे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी सर्वांचे एकमत झाले.
तसेच या बैठकीस सोलापूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते पाटील हे अनुपस्थित होते. एका प्रकरणामध्ये सध्या त्यांनी जामीन मिळविण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली आहे त्यामुळे त्यांचे सुप्रीम कोर्टातील प्रकरण पूर्ण होईपर्यंत सोलापूर जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार सोलापूर जिल्हा किसान कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल कौलगे पाटील तुम्ही स्विकारावा असे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले यांनी बैठकीत सांगितले असता त्यास राहुल कौलगे पाटील यांनी सहमती दर्शवली
त्यामुळे आता आगामी काळात निवडणूकीच्या दृष्टीने सोलापूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे प्रभारी अध्यक्षपद राहुल कौलगे पाटील यांच्याकडे देण्याची शक्यता आहे. राहुल पाटील यांनी नेहमीच शेतकरी,कमगार विविध सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवून कॉंग्रेसचा विचार, ध्येयधोरणे तळागाळात पोहोचविण्याचे काम केलेले आहे व करत आहेत त्यामुळे त्यांच्यावर प्रदेशाध्यक्ष आ.पटोले यांनी मोठी जबाबदारी मिळत असल्याचे संकेत दिले आहेत यावेळी विजयकुमार हत्तुरे ,काका कुलकर्णी ,भीमराव बाळगी सर, मल्लेशी बिडवे सर ,रमेश हसापुरे, राधाकृष्ण पाटील ओबीसी जिल्हाध्यक्ष रुपनवर आदी सह पदाधिकारी उपस्थित होते
Tags
राजकीय वार्ता