पंढरपूर प्रतिनिधी --
पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्थांचे चेअरमन सोमनाथ देशमुख पंढरपूर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य हॉलीबॉल स्पर्धा चे आयोजन उजनी वसाहत हॉलीबॉल क्लब पंढरपूर यांच्या वतीने करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन सुप्रभात मित्र मंडळाचे
अध्यक्ष धनाजी देशमुख पंढरपूर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पाटबंधारे विभागाचे अधिकारी पी. व्ही. कुलकर्णी, ठेंगील,सारगे उपस्थित होते.
या स्पर्धेत एकूण आठ संघाने सहभाग घेतला होता प्रथम क्रमांक दूध पंढरी पंढरपूर या संघाने पटकावला द्वितीय क्रमांक प्राधिकरण संघाने पटकावला तर उत्तेजनार्थ खर्डी संघ व पाटबंधारे संघाने पटकवला सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी काळुंगे, शेंडे, दरदरे,
जाधव, मोरे तसेच पाटबंधारे विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी स्पर्धा यशस्वी करण्याकरता परिश्रम घेतले.
Tags
क्रीडा वार्ता