महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते ध्वजारोहण...


पंढरपूर प्रतिनिधी --
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 64 व्या वर्धापन दिनानिमित्त तहसिल कार्यालय, पंढरपूर येथे प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते सकाळी  8.00 वाजता ध्वजारोहण करण्यात आले.
          
तहसिल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या या ध्वजारोहण सोहळयास तहसिलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, नायब तहसिलदार मनोज श्रोत्री, पंडीत कोळी, वैभव बुचके, गटशिक्षण अधिकारी मारुती लिगाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले उपस्थित होते. यावेळी राष्ट्रगीत व राज्य गीत गायन झाले. तसेच पोलीस पथकाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.
       
याप्रंसगी स्वांतत्र्यसैनिक,  शासकीय अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी व  नागरीक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form