आंतरजिल्हा बदली शिक्षकांना कार्यमुक्त करावे सोलापूर जिल्हा शिक्षक समितीची मागणी

 सोलापूर  ( दि. १५) 
आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना तत्काळ कार्यमुक्त करावे तसेच  १ नोव्हेंबर २००५ पूर्वी जाहीरात निघालेल्या व त्यानंतर  सेवेत दाखल झालेल्या  शिक्षकांना मूळची जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी विकल्प भरुन घ्यावेत अशी मागणी शिक्षक समितीचे  जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांनी दिली . 
       सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत  शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील व शिक्षणाधिकारी कादर शेख यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. राज्यातील २५ हून अधिक  जिल्हा परिषदांनी १ नोव्हेंबर २००५ पूर्वी जाहीरात निघालेल्या मात्र त्यानंतर शिक्षण सेवक म्हणून सेवेत आलेल्या शिक्षकांना मूळची जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्य शासनाच्या  आदेशानुसार विकल्प भरुन घेण्याची  कार्यवाही केली आहे . मात्र शिक्षक समितीने अनेकदा पाठपुरावा करुन देखील सोलापूर जिल्हा परिषदेने याबाबतीत दिरंगाईचे धोरण अवलंबल्याची बाब यावेळी निदर्शनास आणून देत तत्काळ विकल्प भरुन घ्यावेत अशी मागणी करण्यात आली.
        याशिवाय विनाअट जिल्हांतर्गत बदल्या करण्यात याव्यात , आंतरजिल्हा बदली शिक्षकांना त्वरीत कार्यमुक्त करावे , कन्नड व उर्दू माध्यमातील पदावनत करण्यात  आलेल्या मुख्याध्यापकांना  पात्र शाळेवर प्राधान्याने पदस्थापना द्यावी , मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमातील विजेत्या शाळांचा गौरव सोहळा आयोजित करुन प्रेरणा द्यावी , शैक्षणिक अर्हताधारक विज्ञान विषय शिक्षकांना वेतनश्रेणीचा लाभ द्यावा , रिक्त व राखून ठेवलेली  केंद्रप्रमुख पदे त्वरीत भरण्यात यावीत , सेवानिवृत्त होणाऱ्या  शिक्षक बांधवांना निवृत्ती विषयक सर्व लाभ तत्काळ मिळावेत इत्यादी  प्रश्नांवर तपशीलवार चर्चा होऊन यापैकी बहुसंख्य विषय नविन शैक्षणिक सत्र सुरु होण्यापूर्वी मार्गी लावण्यात येतील अशी ग्वाही शिक्षणाधिकारी शेख यांनी दिली .
        यावेळी झालेल्या चर्चेत समितीचे राज्य उपाध्यक्ष राजन सावंत , जिल्हा सरचिटणीस शरद रुपनवर , अमोघसिद्ध कोळी , डाॕ.रंगनाथ काकडे , जिल्हा नेते संतोष हुमनाबादकर , कार्यकारी अध्यक्ष सुनिल कोरे , मो.बा. शेख , कन्नड विभाग प्रमुख बसवराज गुरव यांनी चर्चेत भाग घेतला . यावेळी शिक्षक समितीचे पदाधिकारी संजय पाटील, अन्वर मकानदार , मोहन बाबर , सचिन गावसाने , रमेश साठे , शेखलाल शेख , महिपती अनुसे , अशोक जगदाळे , वासुदेव बाबर , दत्तात्रय  बोबलादे , केशव अभंगराव , परमेश्वर गायकवाड , शिवाजी बनसोडे , संतोष रुपनवर , नागेश सिताप , विकास वाघमारे , भारत हंबीरराव , बाळासाहेब काटे , भिमण्णा कट्टीमणी , सिद्धण्णा कोळी , तुकाराम मुचंडे , संजय मेसे , इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते .

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form