पंढरपूर प्रतिनिधी:
श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित लोट्स इंग्लिश स्कूल कासेगावच्या सी.बी.एस.ई. च्या मार्च 2023-24 च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये खर्डी ता.पंढरपुर येथील विद्यार्थीनी कु. सृष्टी मोहन रोंगे हिने ९३.८०% गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले असून तिचा लोटस इंग्लिश स्कूलमध्ये व्दितीय क्रमांक आला असून हिंदी विषयात १०० पैकी ९९ गुण मिळवून विशेष प्राविन्य मिळवले आहे.
या यशामध्ये कुमारी सृष्टीने कोणतेही खाजगी क्लासेस न घेता आई-वडिलांचे योग्य मार्गदर्शन आणि मेहनत व जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.
या यशाबद्दल सृष्टी हिचे सर्व स्तरातून कौतुक केले जात असून खर्डी गावातील व पंढरपूर तालुक्यातील अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांकडून तिचा सन्मान केला जात आहे. खर्डी ग्रामपंचायत माजी सरपंच रमेश हाके आदर्श शिक्षक संतोष मोरे, आप्पा रोंगे, तसेच पत्रकार संतोष कांबळे यांच्या वतीने तिचा सन्मान करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Tags
सामाजिक वार्ता