सध्या लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत राजकीय, सामाजिक व प्रशासन गुंतले आहे. यामध्ये पाणी टंचाई बावत कोणीही प्रयत्न केल्याचे दिसत नाही...
पंढरपूर प्रतिनिधी --
मोहोळ मतदार संघात मागेल त्याला मिळणार पिण्याचे पाणी पहिल्या टप्प्यात पाच टैंकर्सचे माध्यमातून २४तास पाणी पुरवठा सेवा राहणार सुरू.
**मोहोळ शहरातील लोकांसाठी दोन तसेच मोहोळ ग्रामीण भागासाठी दोन आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील लोकांसाठी एक असा टॅंकंर द्वारे पाणी पुरवठा सुरू केला आहे.**
मोहोळ विधानसभा राखीव मतदार संघाचे उमेदवार उद्योजक आणि समाजसेवक राजू खरे यांनी पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता, नागरिकांच्या मागणीनुसार पहिल्या टप्यात पाच टैंकर्सच्या माध्यमातून रविवार दिनांक २९ एक्रिल पासून २४तास
पिण्यासाठी मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे. राजू खरे यांनी मागील अनेक वर्षा
पासून मोहोळ विधानसभा लढविण्यासाठी मोठी तयारी ठेवली आहे. यामुळे मागेल त्याला रस्ता आणि मागेल त्याला पाणी देण्याची हिम्मत ठेवली आहे. मागील काही दिवसापूर्वी अनेक गावातील लोकांसाठी बोअर पाडुन दिले होते. काही काळ हे बोअरमधून पाणीपुरवठा केला गेला.
सध्या ऐन उन्हाळा आणि दुष्काळाची मोठी छाया पडली आहे. यामुळे बोअर मधील पाणी पुरवठा बंद पडला आहे. यातूनही माझ्या मतदार संघातील लोकांना पाणी मिळाले पाहिले हीच भूमिका पार पाडण्यासाठी राजू खरे यांनी मोहोळ मतदार संघातील लोकांसाठी खास टैंकर्स सुरू केले आहेत.
*जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही*!
सध्या लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पालकमंत्री, मंत्री, यासह प्रशासन गुंतले आहे. यामध्ये पाणी टंचाई बावत कोणीही प्रयत्न केल्याचे दिसत नाही. यामुळे आपण अशा या लोकसभा निवडणुकीत अलिप्त राहू, पण माझ्या मतदार संघातील जनतेला पाणी देऊ अशी प्रतिक्रिया राजू खरे यांनी व्यक्त केली आहे. पंढरपूर तालुक्यातील जी गावे या मोहोळ मतदार संघात येत आहेत. त्यांच्यासाठीही लवकरच दुसऱ्या टप्यात मागणीनुसार आपण पाहिजे तेवढे टैंकर्स उपलब्ध करून देणार असल्याचे जाहीर करून टाकले आहे.
आगामी काळात पाण्याची मागणी वाढतच जाणार आहेत. त्यासाठी आणखी टैंकर्स वाढविण्याची तयारी खरे यांनी ठेवली असून आपण मोहोळ विधानसभा मतदार संघातील लोकांना पाणी कमी घडू देणार नसल्याचेही सांगितले आहे. खरे यांनी आजवर अनेक गावातील रस्ते, आरोग्यासाठी मदत, शिक्षण संस्थांना मोठी मदत याबरोबरच गरिबांना विविध कार्यासाठी आर्थिक मदत केली आहे.विविध जयंती उत्सव यासाठी आपला हात कायम सैल ठेवला आहे. त्यामुळे मोहोळ मतदार संघातील नागरिकांनी आपल्याला पाणी देणारा एकच नेता आहे. त्याचे नाव राजू खरे असून यांच्याकडे मागणी केली कि काम फत्ते होते.याची तात्काळ दाखल घेत पहिल्या टप्प्यात पाच टैंकर्सचे माध्यमातून अनेक खेपा करून गावोगावी पाणी पुरवठा सुरू केला आहे. यामुळे अडचणीच्या काळात मदतीला धावून येणाऱ्या या राजू खरे यांचे विशेष आभार मानले जात आहे.
Tags
सामाजिक वार्ता