चंदुकाका सराफ प्रा. लि. पंढरपूर मध्ये मातृदिन मोठ्या उत्साहात साजरा

पंढरपूर प्रतिनीधी--
198 वर्षांची गौरवशाली परंपरा जपणाऱ्या, व मूळ बारामतीची असणारी सुवर्णपेढी चंदुकाका सराफ प्रा. लि. मध्ये आज जागतिक मातृदिन साजरा करण्यात आला याप्रसंगी प्रभा-हिरा प्रतिष्ठान संचलित पालवी या संस्थेच्या मंगल शहा मॅडम उपस्थित होत्या त्याचबरोबर कला, क्रीडा ,सामाजिक, सांस्कृतिक ,आणि आर्थिक क्षेत्रात आपले महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या मातांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी सुनंदा बोडके, सुनिता धोत्रे ,लतिका मोरे, कविता देवकते ,शोभा तूपसांगवे, नीता धुमाळ ,अंजना जाधव, लता जगताप ,विजया देठे ,उज्वला जगताप उपस्थित होते.
 तसेच  पंढरपूर शाखेचे शाखाप्रमुख दिपक चव्हाण सर यांनी सध्या सुरू असलेल्या चैन अंगठी महोत्सव बद्धल माहिती देऊन मार्गदर्शन केले व बंडू गोफणे सर यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. तसेच या कार्यक्रमाप्रसंगी ऑपरेशन मॅनेजर अनिल वठारे सर ,संदीप पवार सर व इतर स्टाफ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रणजीत सावळे व नियोजन संजय सावळे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form