पंढरपूर प्रतिनीधी--
वाडीकुरोली येथे भव्य दिव्य अशा वारकरी बाल संस्कार शिबिराचा शुभारंभ वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. दिनांक 10मे ते 25 मे या कालावधीत हे शिबिर संपन्न होणार आहे. यावेळी ह. भ .प. दिलीप मोरे महाराज, सुदाम मोरे, धनंजय गुरव महाराज, राहुल फडतरे, वेदांत राकुंडे वाडीकुरोलीचे सरपंच रामचंद्र काळे माजी सरपंच सुभाष कुंभार काळे मधुकर काळे तंटामुक्तीचे अध्यक्ष सत्यवान नाईक नवरे योगेश काळे दिलीप काळे प्राचार्य दादासो खरात पर्यवेक्षक सत्यवान काळे ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना कल्याण काळे म्हणाले की वारकरी सांप्रदाय व भागवत धर्माचे विचार लहानपणापासूनच विद्यार्थ्यांच्या मनावर कोरले तर सुसंस्काराची बीजे त्यांना मिळून भावी आयुष्यात ही मुले सुसंस्कारशील झाल्याशिवाय राहणार नाहीत. या शिबिराच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या स्तुत्य उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिबिराचे संयोजक आदेश काळे महाराज यांनी केले प्रास्ताविकात त्यांनी सांगितले की पंधरा दिवसाच्या या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गायन पखवाज व तबलावादन प्रवचन कीर्तन इत्यादी उपक्रम राबवले जाणार असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाचे आचार विचार देण्याचा प्रयत्न शिबिराच्या माध्यमातून होणार आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान प्रा. काळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार ह .भ. प. मधुकर काळे यांनी मानले.
Tags
सामाजिक वार्ता