अभिजित पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार -- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पंढरपूर प्रतिनिधी-- 
साखर कारखाना चालवण्याची किमया ही भल्या भल्यांना जमली नाही. साखर 
कारखान्याच्या माध्यमातून साखर कारखाने हे कर्जात ठेवण्याचे व आर्थिक घोटाळे करण्याचे ठिकाण समजले जाणाऱ्या भ्रष्ट नेत्यांना दूर करून अभिजीत आबा पाटील यांनी बंद स्थितीत असलेला हा विठ्ठल सहकारी साखर कारखाना पुन्हा जोमाने सुरू केला. या कारखान्याच्या जुन्या संचालक मंडळांनी व तत्कालीन नेत्या लोकांनी हा कारखाना डबघाईस आणून आपला स्वार्थ साधला आहे. व सभासदांच्या जीवावर राजकारण केलेले आहे.अभिजीत आबा पाटील यांच्यासारख्या तरुण युवकाला सर्वसामान्य शेतकरी सभासदांसाठी, कामगारांसाठी त्यांचे कल्याण करण्यासाठी एक उमेद घेऊन संघर्ष करणाऱ्या अभिजीत पाटील सारख्या युवकाला आम्ही सर्वतोपरी बळ देणार आहोत.असे देखील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी या जाहीर सभेत व्यक्त केले.
सोलापूर लोकसभा मतदारसंघ आणि माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते तसेच रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या निवडणुकीतील प्रचाराच्या समारोपाच्या जाहीर सभेमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या प्रचार सभेतील भाषणामध्ये बोलत असताना त्यांनी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे वर्णन आणि सभासदांचे वर्णन हे श्री विठ्ठल म्हणजे आई आणि त्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सभासद म्हणजे बाळ अशी उपमा देऊन त्यांनी श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखाना  आर्थिक संकटाचे निवारण करण्यासाठी व या कारखान्याला कर्जमुक्त करून प्रगतीपथावर नेण्यासाठी मदत करणार आहे."आई ही जगली पाहिजे आणि बाळ ही जगले पाहिजे"अशी साहित्यिक उपमा देऊन देवेंद्र फडणवीस यांनी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यातील संचालक व सभासद व या दोन्ही मतदार संघातील मतदारांचे मन जिंकले. 
    
बंद स्थितीत असलेले साखर कारखाने, अडचणीत असलेले साखर कारखाने हे ताब्यात घेऊन हे बंद कारखाने तीस-पस्तीस दिवसांमध्ये सुरू करण्याची किमया या तरुण होतकरू आणि प्रामाणिक अशा अभिजीत आबा पाटील यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली. 
       
सर्वसामान्य शेतकरी बांधवांसाठी, कामगारांच्या कल्याणासाठी संघर्ष करणाऱ्या युवकाला भाजप सरकार केव्हाही मदत करत असते.अशीच मदत ऊस उत्पादक शेतकरी तसेच कामगार यांच्याकल्याणासाठी झटणाऱ्या अभिजीत पाटील सारख्या युवकाला आम्ही मदत करणार आहे.
यापुढील काळामध्ये श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला सर्वतोपरी आर्थिक, तांत्रिक बळ देण्याचे आमचे नियोजन आहे. असे त्यांनी आपल्या प्रचार सभेमध्ये आपले मनोगत व्यक्त करत त्यांनी सर्व सभासदांच्या कडून व सर्वसामान्य मतदारांच्या कडून सोलापूर लोकसभा मतदारसंघ व माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे दोन्ही उमेदवारांना या निवडणुकीमध्ये प्रचंड मताने निवडून द्या अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 
     
 या प्रचार सभेस आमदार शहाजी बापू पाटील, रणजीत सिंह नाईक निंबाळकर, राम सातपुते, महेश साठे, तानाजी सावंत, अनिल सावंत, दिलीप धोत्रे,रोंगेंसर , मस्के सर आदी भाजपच्या उमेदवार उपस्थित होते. त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे गट,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असे महायुतीतील असंख्य मान्यवर नेतेमंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form