संभाजी ब्रिगेडचा प्रणितीताई शिंदे यांना पाठींबा...

मराठा आरक्षणासह इतर काही विषयाच्या विरोधात संभाजी ब्रिगेडच्या सोबत...
सोलापूर प्रतिनिधी --
संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना शनिवारी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर या महामानवांची विचारधारा जोपासणे हे आपले कर्तव्य आहे. म्हणून आम्ही या निवडणुकीस पाठींबा देत असल्याचे संभाजी ब्रिगेडकडून स्पष्ट करण्यात आले. 
संभाजी ब्रिगेड महासचिव शिवश्री सौरभ दादा खेडेकर यांनी यावेळी प्रणितीताई शिंदे यांना पाठिंबा दिल्याचे पत्र दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष शिवश्री - सोमनाथ राऊत, शहराध्यक्ष - शिवश्री प्रकाश ननवरे, सोलापूर काँग्रेस कमिटी अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे,नगरसेवक विनोद भोसले,युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, संभाजी ब्रिगेड कडून प्रणिती शिंदे यांनी निवडून  आल्यावर समाजाच्या काही मागण्या पूर्ण करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याचे आवाहन केले. त्यामध्ये 
१)मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश होणे बाबत.
२) शिवस्मारक पूर्ण होणेबाबत.
३) स्वामीनाथन आयोग लागू करणे बाबत.
४) सर्व शिक्षण मोफत मिळावे. (KG to PG)
५) तरुणांना रोजगार मिळावा 
६) कंत्राटी भरती न होऊ देणे बाबत.
७) जिह्यातील शेतीविषयक पाण्याचे धोरण राबविणे.

यावेळी बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, संभाजी ब्रिगेडने आम्हाला या निवडणुकीत दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते. मराठा आरक्षणासह इतर काही विषयाच्या विरोधात संभाजी ब्रिगेडचा जो संघर्ष सुरु आहे. एक तुमची बहीण म्हणून ती संघर्ष कधीच वाया जाऊ देणार नाही. मी तुमच्या प्रत्येक लढ्यात तुमच्या सोबत असल्याचे आश्वासनही यावेळी प्रणिती शिंदे यांनी दिले.

प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या की, भाजपकडून जाती-धर्माचे राजकारण करून द्वेष निर्माण केला जात आहे. दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहे. या माध्यमांतून सोलापूरची एकी बिघडवण्याचे पाप भाजप करत आहे. त्या विरोधात आपल्या सगळ्यांना एकत्र येत काम करायचे आहे. त्यांना लोकशाहीची समाजाची ताकद काय असते हे त्या साथ मेला मतदानातून दाखवून द्यायचे. त्यामुळे लोकसभेची ही निवडणूक जरी माझी असली तरी विजय तुम्हा सर्वांचा असणार असल्याचेही मत शिंदे यांनी व्यक्त केले.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे मनोजकुमारजी गायकवाड(सहसंघटक संभाजी ब्रिगेड)दिनेशजी जगदाळे(राज्य कार्यकारिणी सदस्य)किरणराज घाडगे(विभागीय अध्यक्ष,पुणे विभाग), सोमनाथ राऊत(सोलापूर जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड), प्रकाश ननवरे (सोलापूर शहराध्यक्ष संभाजी ब्रिगेड), कृष्णात पवार(सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड), दयानंद काजले(सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष), अजय सोमदले (सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष), मनोज गंगणे(अक्कलकोट तालुका अध्यक्ष),  सुरेश कदम(अक्कलकोट शहर अध्यक्ष), अभिजित भोसले(मोहोळ तालुका अध्यक्ष), विष्णू मुळे (उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष), मनोज महाडिक (दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष), आनंद काशीद (बार्शी तालुका अध्यक्ष), ललित धावणे, सचिन चव्हाण, नितीन मोहित, सोमनाथ निंबाळकर, नितीन चव्हाण, किसन गायकवाड उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form