अकलूज प्रतिनिधी
अकलूज येथे वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने जगत ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
विजय चौकातील महादेव मंदिर येथे आज सकाळी सात वाजता जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन अकलूज वीरशैव लिंगायत समाजाचे माजी खजिनदार व माळशिरस तालुका जनसेवा संघटनेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन (पिंटू) मंगल चंद्रकांत वैद्य- देशमुख व सौ प्राजक्ता मल्लिकार्जुन वैद्य देशमुख या उभयतांच्या शुभहस्ते करण्यात आले.त्यानंतर सकाळी दहा वाजता महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,आ.रणजीतसिंह मोहिते पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते धैर्यशील मोहिते-पाटील यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या मुर्तीला पुष्पहार घालून दर्शन घेतले.
यावेळी लिंगायत समाजाचे अध्यक्ष विलास क्षीरसागर,उपाध्यक्ष संतोष देव शेटे,नागेश लिगाडे,पप्पू आंधळकर,भीमाशंकर वैद्य सोलापूर जिल्हा जनसेवा संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ गुळवे,बापू गुळवे,महेश डिकोळे, प्रभाकर बिराजदार,राजू सरगर, जगदीश स्वामी,सचिन कथले, अशोक शेटे,पोपट शेटे,दिग्विजय शेटे,संतोष कोल्हे,सोमनाथ बिराजदार,डॉ.चंदन सरताळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
Tags
सामाजिक वार्ता