पंढरपूर प्रतिनिधी:
पंढरपूर तालुक्यातील कौठळी गावचे सुपुत्र
गणेश संभाजी धुमाळ यांना पुणे येथील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग क्षेत्रातील पीएच.डी. प्रदान करण्यात आली आहे. त्यांचा संशोधनाचा विषय ‘डबल पाइप हीट एक्सचेंजर ट्विस्टेड टेप आणि हेलिकल टेप इन्सर्ट-परफॉर्मन्स प्रीडिक्शन’असा होता. ह्याचा वापर कार्यक्षमता प्रीडिक्शन, बॉयलर,रिन्यूएबल एनर्जी सिस्टिम, वेस्ट हीट रिकव्हरी यामध्ये होऊ शकतो.
गणेश धुमाळ यांनी पीएच.डी. दरम्यान, उच्च मानांकित आंतरराष्ट्रीय एल्सेव्हियर जर्नल्समध्ये तीन शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. तसेच त्यांनी दोन आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले. यासाठी त्यांना प्रा.डॉ.संजय एन.हावलदार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
गणेश धुमाळ यांना त्यांच्या उल्लेखनीय यशासाठी कुलगुरू डॉ. रविकुमार एम.चिटणीस यांनी विद्यापीठातर्फे सत्कार करुन अभिनंदन केले. तसेच राहुल कराड, अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, डॉ.दिनेश शेठ, डॉ. शिवप्रकाश बर्वे, डॉ. कृष्णा वऱ्हाडे यांचे सहकार्य लाभले. डॉ.गणेश धुमाळ हे युनाइटेड स्टेट येथील मल्टिनॅशनल मॅटेलिओ कंपनीमध्ये डेटा सायंटिस्ट पदावर काम करत आहेत. त्यांच्या यशासाठी सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
Tags
शैक्षणिक वार्ता