*प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी हेलिकॉप्टरमधून नेले सोबत*
पंढरपूर प्रतिनीधी--
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे पंढरपूर भागातील विश्वासू शिलेदार असलेले राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष आणि सहकार शिरोमणी सह साखर कारखान्याचे संचालक नागेश फाटे यांच्यावर जबाबदारी वाढली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्यावर नितांत श्रद्धा असलेले नागेश फाटे हे आज माळशिरस तालुक्यातील खा शरद पवार यांचे सभेसाठी गेले होते. त्याठिकाणी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटीलही उपस्थित होते. सभा संपताच पाटील यांनी नागेश फाटे यांना आपल्या सोबत घेऊन थेट हेलिकॉप्टरने आटपाडी पर्यंत प्रवासात सोबत घेतले. मतदार संघातील सर्व परिस्थितीची माहितीही जाणून घेतली आहे. यामुळे राष्ट्रवादीत यापुढे नागेश फाटे यांचे वजन वाढले आहे.
हा सोबत घडलेला प्रवसाबाबत नागेश फाटे यांना विचारले असता, त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की,आज माझ्या नेत्यांसोबतचा हेलीकॉप्टर प्रवास एक वेगळीच अनुभूती देनारा होता. काम करण्याची उम्मीद आणि प्रेरणा वेळोवेळी अनुभवायला मिळते साहेबांसोबत चा सहवासात माढा लोकसभा मतदारसंघातील जाहीर सभा संपवून पुढील प्रचार दौरा साठी निघालो माळशिरस ते आटपाडी, सांगली येथे जाताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.जयंतराव पाटील साहेब यांसमवेत हेलीकॉप्टर प्रवास करण्याची संधी मिळाली .
ह्या प्रवासादरम्यान अध्यक्ष साहेबांच्या खांद्याला खांदा लावून पक्ष संघटनेचे काम करावे लागेल याची जाणीव मला झाली यापुढे आजून चांगले काम संपूर्ण महाराष्ट्र भर करावे लागणार लोकसभेच्या अजून पुढील टप्प्यातील निवडणूक दौऱ्याबद्दल साहेबांनी माहिती घेतली व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. !
Tags
राजकीय वार्ता