चंदुकाका सराफ प्रा. लि.शाखा पंढरपूर मध्ये चित्रकला स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न


पंढरपूर प्रतिनिधी --
पंढरपूर येथे दिनांक 17/05/2024
 198 वर्षांची गौरवशाली परंपरा जपणाऱ्या, व मूळ बारामतीची असणारी सुवर्णपेढी चंदुकाका सराफ प्रा. लि. पंढरपूर मध्ये आज चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या चित्रकला स्पर्धा मध्ये बाल चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने घेण्यात आलेल्या स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने विध्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता ही स्पर्धा चित्रकलेचे शिक्षक अमित वाडेकर, विलास जोशी  व अण्णासाहेब व्यवहारे  यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या स्पर्धेतील  6 ते 9 वयोगटातील प्रथम क्रमांक स्वरा सुरेंद्र कवडे ,द्वितीय क्रमांक अजनेश अतिश पवार ,तृतीय क्रमांक रिशान सरडे व 9 ते 12 वयोगटातील प्रथम क्रमांक जय सचिन साळवे, द्वितीय क्रमांक सिया शाहू सतपाल ,तृतीय क्रमांक संध्या महादेव भोसले या विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले तसेच या स्पर्धेतील सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला या स्पर्धेला पंढरपूर शाखेचे व्यवस्थापक दिपक चव्हाण, बंडू गोफणे,ऑपरेशन मॅनेजर अनिल वठारे सर,फ्लोअर मॅनेजर संदीप पवार सर उपस्थित होते.तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण काळे,व्यवस्थापन रणजित सावळे, संजय सावळे, सागर मोरे, विनायक पवार व इतर कर्मचारी यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form