अहमदपूर प्रतिनिधी--(राम रत्नपारखी)
येथील सराफआसोसिएशनच्या
वतीने लातूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार बंधू भगिनीमध्ये जनजागृती व्हावी, मतदानाचा टक्का वाढावा म्हणून सराफ असोसिएशन व स्वीप पथकाच्यावतीने अहमदपूर येथील सराफ दुकानातील सोने खरेदीच्या पावतीवर जागृत नागरिक होऊ या.. अभिमानाने मत देवू या..! वाढवू तिरंग्याची शान... करु या देशासाठी मतदान..! चला मतदान करु या.. लोकशाही रुजवू या..! वृद्ध असो किंवा जवान.. सर्वजन करा अवश्य मतदान ..! अशा घोषवाक्याचा स्टॅम्प वापरून जनजागृती केली.
लोकशाहीतील या महाउत्सवात प्रत्येक मतदारांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविण्याची गरज आहे.
संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. दि.७ मे रोजी १०० टक्के मतदान करण्यासाठी अहमदपूर सराफ आसोशिएशनच्यावतीने आवाहन करण्यात आले. सदरील कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्वीप प्रमुख महादेव खळुरे, शिवकुमार गुळवे यांच्यासह सराफ व सुवर्णकार आसोसिएनचे अध्यक्ष संतोष मद्देवाड, सचिव गजानन कमठाणे, उपाध्यक्ष रवि मिरजकर, भरत इगे, सचिन करकनाळे, संजय गोटमवाड, प्रविण महामुणी, विनोद शिंगडे, मनोज करंडे, मधुकर आगलावे, बालाजी गादेवार, राम रत्नपारखे, संजम शहाणे, ओम कंधारकर, किशोर पेड, परमेश्वर काळे, विश्वजीत बंगाली, सुभाष बंगाली, गजानन खेडकर आदींनी परिश्रम घेतले.
Tags
सामाजिक वार्ता