पंढरपूर प्रतिनिधी --
मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सायकल फेरीचे आयोजन हा अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा स्तुत्य उपक्रम आहे अशा भावना शहर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी केले. ते सायकल फेरीच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
सध्या देशभर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम सुरू आहे. निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध पातळीवरून प्रयत्न सुरू केले आहेत. आवाहन करण्यात येत आहे त्यास प्रतिसाद देत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे पंढरपूर सायकलर्स क्लब व कोर्टी रोड सायकल क्लब यांच्यासह पंढरपूर शहरातून सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते त्यास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
प्रारंभी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हा संघटक दीपक इरकल यांनी प्रास्ताविकामध्ये सायकल फेरीचा उद्देश स्पष्ट करुन उपस्थित सर्वांचे स्वागत केले.
जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी ग्राहक पंचायत समस्या सोडविण्याबरोबरच ग्राहक प्रबोधनाचे महत्त्वाचे काम करते त्याचाच एक भाग म्हणून मतदार जनजागृती मोहीम सुरू केली आहे त्यातील सायकल फेरी हा उपक्रम आयोजित केल्याचे सांगितले.
या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूरचे दिव्यांग प्रतिनिधी श्री ननवरे,दतात्रय खताळ, सागर अष्टेकर, लवंड मॅडम व त्यांचे सहकारी या दिव्यांग मतदार जागृतीसाठी सायकल फेरीमध्ये सहभागी झाले होते.त्यांचाही गौरव पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी केला.
ही सायकल फेरी शहरातील भोसले चौक अर्बन बॅंक-भादुले चौक, नाथ चौक,प्रदक्षिणा मार्गावरून शहर पोलीस ठाण्यात विसर्जित झाली.
यामध्ये अ.भा.ग्राहक पंचायतीचे जिल्हा सचिव सुहास निकते, जिल्हा सदस्य पांडुरंग अल्लापूरकर,तालुका अध्यक्ष विनय उपाध्ये, संघटक महेश भोसले,सचिव प्रा. धनंजय पंधे, उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे,आझाद अल्लापूरकर, सदस्य सागर शिंदे, दिलिप पाठक,श्रीराम साळुंखे, पंढरपूर सायकलर्स क्लबचे सुरज अष्टेकर, संतोष पाटोळे,
अभिजीत गोंजारी, सुनिल क्षीरसागर,संतोष कवडे व्ही.एम पाटील,अमर देशमुख,राजु भाटिया,मोहन बोडके तसेच कोर्टी रोड सायकल क्लबचे के.जी.जाधव, शाम तापडिया,श्रीनाथ साळूंखे ढोबळे साहेब, इ.उपस्थित होते.शहर पोलीस स्टेशन वाहतूक शाखेचे सपोनि जनार्दन हेगडकर व पो कॉ. हजारे८७७, वडेट्टीवार२१८७, कुंभार ३८०,केवळे १३१५यांनी फेरी व्यवस्थित पार पाडण्यासाठी मोलाचे कार्य केले.
Tags
सामाजिक वार्ता