*वझरे येथे महायुतीचे उमेदवार रणजीत सिंह यांची प्रचार सभा*
नाझरे प्रतिनिधी--
ऐन उन्हाळ्यात शेतीसाठी, पिण्याच्या पाण्यासाठी व जनावराच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी टेंभू योजनेचे पाणी मान नदीत सोडण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व अजितदादा पवार यांना साकडे घालून दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी फार मोठा प्रयत्न केला व त्यामुळे दुष्काळ भागाला पाणी वळवणारा खासदार म्हणून रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन आमदार शहाजी बापू पाटील यांनी वझरे ता. सांगोला येथे प्रचार सभेत केले.
देशाचा नेतृत्व कोणाकडे असावे यासाठी तुमची एक मत महत्त्वाचे आहे व आपणास मोदींना पंतप्रधान करायचे आहे व गेली 50 वर्षे सांगोला तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे व ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांना साकडे घालून दुष्काळी निधी आणून शेतकऱ्यास मदत केली व या अगोदर अकलूज कर व बारामतीकरांनी पाण्याबाबत आपल्या सांगोला तालुक्यावर अन्याय केला व पाणी पळवून नेले परंतु नेलेले पाणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर मुळे पुन्हा दुष्काळी भागाला वळवले व यासाठी पाणी पळवणारा नको आहे पाणी वळवणारा आपणास पाहिजे व यासाठी आपल्या सर्वांचे ठरले आहे रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनाच विजयी करायचे आहे व त्यांनाच प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन ही आमदार शहाजी भाऊ पाटील यांनी यावेळी केले. व तुतारीच्या नादाला लागू नका, तुतारीची फुकारी करा व विकासासाठी निंबाळकरांना साथ द्या व मोदींना पंतप्रधान करण्यासाठी निंबाळकरांच्या कमळ या चिन्हावरच बोट दाबून विजयी करा असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
कोयनेतून कृष्णेचे पाणी मान नदीत सोडण्यासाठी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांचा मोठा वाटा आहे व आज मान नदी टेंभूच्या पाण्याने वाहत आहे व आपणास मोदींना पंतप्रधान करायचे आहे व त्यासाठी निंबाळकरांना विजयी करायचे आहे व त्यांच्यामुळे सांगोला तालुक्याच्या विकासात मदत झाली व यापुढे शेराने मागू नका, सुपाने मागा मग प्रश्न कोणताही असो तो सोडवू असे मत माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी प्रचार सभेत व्यक्त केले. तालुक्यात बऱ्यापैकी रस्ते झाले, पाणी झाले व पाणी आहे परंतु लाईट नाही असे माझी प्राचार्य के वाय पाटील यांनी सांगितले तर येथील विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी येत्या विधानसभेपूर्वी वझरे गावात विजेचे उपकेंद्र करू. तसेच गणिताचे अनुदान सर्वांना मिळाले का व नाही मिळाले तरी सांगा ते मिळवून देऊ व अजून प्रश्न असतील ते सांगा तेही सोडवू परंतु उद्याच्या निवडणुकीत रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनाच विजयी करा असे आवाहन माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी यावेळी प्रचार सभेत केले.
सुरुवातीस माजी सरपंच उत्तम सरगर यांनी सर्वांचे स्वागत केले तर टेंभूच्या पाण्याने शेतकरी समाधान झाला परंतु सध्या पाणी आहे परंतु लाईट नाही अशी परिस्थिती झाली आहे व यासाठी वजरे येथे विजेचे उपकेंद्र करा तसेच श्री दत्त मंदिराचा शक्तिपीठ मार्गात घेऊन विकास करा व मान नदीवर पूल बांधून येथील प्रश्न सोडवा असे मत माजी प्राचार्य के वाय पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी सरपंच संजय कोकरे, उपसरपंच बाबुराव जाधव, माजी सरपंच महादेव पवार, राजू पाटील, अशोक पाटील, बाबुराव जोंधळे, वसंत पाटील, गंगाराम रेड्डी, विजय कोटी, राहुल कोटी, राजू खरात, अजय सरगर, सुरेश काका चौगुले, संजय शेळके, सिद्धेश्वर चौगुले, सिद्धेश्वर पाटील, समाधान शेठ यादव, सचिन यादव, रमेश पाटील, मुकुंद पाटील, बापू पाटील, सदा वाघमोडे, दत्ता पाटील, अक्षय सरगर, अक्षय बनसोडे, बापू वाघमारे, सोसायटी चेअरमन बसवेश्वर पाटील,, लक्ष्मण वाघमारे, दत्तात्रय वाघमारे, दीपक शिंदे, गोरख शिंदे, प्रशांत कदम, स्वप्निल रेड्डी, चंद्रकांत रेड्डी, प्रकाश पाटील, लक्ष्मण जाधव, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन आबा पवार तर आभार उत्तम सरगर यांनी मानले.
Tags
राजकीय वार्ता