संत विचार पीठाकडून समता वारी सोहळ्याचे आयोजन

संत साहित्यातील प्रेमींसाठी तिन दिवस भरगच्च कार्यक्रम 
श्री. संत चोखोबाराय यांचा श्री. पांडुरंग दर्शन सोहळा साजरा होणार आहे.
 पंढरपूर  प्रतिनीधी--
संतभूमी म्हणून अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेल्या पंढरपूरात संत विचार पीठाकडून 'समता वारी सोहळ्या' चे आयोजन केले असल्याची माहिती संत विचार पीठ यांच्या द्वारे पत्रकार परिषदेत देण्यात आली.
संताच्या विचारावर आधारित 'संत विचार पीठ' ही संस्था २०२४ साली स्थापन झाली असून या संत विचार पिठात अनेक संत साहित्य क्षेत्रातील अभ्यासू मंडळी, प्रशासकीय क्षेत्रातील अधिकारी, शिक्षक असा मोठा अभ्यासू वर्ग असून संघटनेतील पदाधिकारी व सदस्य संतांच्या विचारांचे प्रचार व प्रसार करीत असून याचे कार्य सर्वदूर पोचले आहे.

याच धर्तीवर येत्या बुधवार ते शुक्रवार तीन दिवस विविध उपक्रम हाती घेतले आहेत. बुधवार ८ मे रोजी मंगळवेढा येथून श्रीसंत चोखोबाराय यांची पालखी नगरप्रदक्षिणा करणार आहे.  दुसऱ्या दिवशी गुरुवार ९ मे रोजी सकाळी ७ ते ९ पंढरीतून प्रदक्षणा करत 'ग्रंथ दिंडी' निघणार आहे. याचे उदघाटन श्रीसंत तनपुरे महाराज ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या हस्ते तर श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशनचे उपाध्यक्ष भिमराव रोंगे, श्रमिक सहयोग, चिपळूणचे उपाध्यक्ष भार्गव पवार हे उपस्थित राहणार आहे. त्यानंतर लोटस इंग्लिश स्कूल मध्ये मदर टेरेसा पुरस्कार विजेत्या, समाजसेविका, जेष्ठ विचारवत मेधाताई पाटकर यांच्या हस्ते लोटस इंग्लिश स्कूल मध्येच संतसाहित्य संमेलनाचे उदघाटन व परिसंवाद कार्यक्रम होणार असून यासाठी श्री, विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन, पंढरपूरचे अध्यक्ष हणमत बागल हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. तर संमेलनाध्यक्ष म्हणून यवतमाळ मधील जेष्ठ विचारवंत, लेखक व तत्वचिंतक डॉ अशोक राणा तर संतविचार पीठ, पंढरपूर चे अध्यक्ष ह.भ.प. भारत जाधव महाराज हे स्वागताध्यक्ष राहणार आहेत. दुपारी सुप्रसिद्ध भारुड गायिका सौ. चंदाताई तिवारी व त्यांच्या सहकार्याचे भारुड हा लोककला प्रकार सादर होणार आहे. यासाठी जेष्ठ पत्रकार व संपादक शिवाजी शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. दुपारच्या भोजनानंतर 'संताची चळवळ' या 'धार्मिक व सामाजिक' या विषयावर पहिले परिसंवाद होणार आहे. 

 सायंकाळी 'साने गुरुजी व संतविचार' या विषयावर दुसर्या परिसंवादाचे आयोजन केले आहे. येथील श्रीसंत तनपुरे महाराज मठामध्ये समन्वय व आढावा बैठक आयोजित केले असून यामध्ये महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. 

अखेरच्या दिवशी शुक्रवार रोजी सकाळी ७. वा. नामदेव पायरी समोर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदीर, महाद्वार येथे 'समतेचा जागर' भजन, गीत व घोषणा इ. श्री. संत चोखोबाराय यांचा श्री. पांडुरंग दर्शन सोहळा साजरा होणार आहे.
 श्रीसंत कैकाडी महाराज विश्वपुण्यधाम मंदीर येथे  ह.भ.प. भारत जाधव महाराज यांच्या अध्यक्षतेखाली 'संतविचार आणि अस्पृश्यता निवारण या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले आहे. अशी माहिती संवादक सारंग कोळी यांनी दिली.
संतभूमी म्हणून अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेल्या पंढरपूरात 'समता वारी सोहळ्या'चे आयोजन केले असल्याची माहिती संत विचार पीठ यांच्या द्वारे पत्रकार परिषदेत देण्यात आली.

संताच्या विचारावर आधारित 'संत विचार पीठ' ही संस्था २०२४ साली स्थापन झाली असून या संत विचार पिठात अनेक संत साहित्य क्षेत्रातील अभ्यासू मंडळी, प्रशासकीय क्षेत्रातील अधिकारी, शिक्षक असा मोठा अभ्यासू वर्ग असून संघटनेतील पदाधिकारी व सदस्य संतांच्या विचारांचे प्रचार व प्रसार करीत असून याचे कार्य सर्वदूर पोचले आहे.

याच धर्तीवर येत्या बुधवार ते शुक्रवार तीन दिवस विविध उपक्रम हाती घेतले आहेत. बुधवार ८ मे रोजी मंगळवेढा येथून श्रीसंत चोखोबाराय यांची पालखी नगरप्रदक्षिणा करणार आहे. दुसऱ्या दिवशी गुरुवार ९ मे रोजी सकाळी ७ ते ९ पंढरीतून प्रदक्षणा करत 'ग्रंथ दिंडी' निघणार आहे. याचे उदघाटन श्रीसंत तनपुरे महाराज ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या हस्ते तर श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशनचे उपाध्यक्ष भिमराव रोंगे, श्रमिक सहयोग, चिपळूणचे उपाध्यक्ष भार्गव पवार हे उपस्थित राहणार आहे. त्यानंतर लोटस इंग्लिश स्कूल मध्ये मदर टेरेसा पुरस्कार विजेत्या, समाजसेविका, जेष्ठ विचारवत मेधाताई पाटकर यांच्या हस्ते लोटस इंग्लिश स्कूल मध्येच संतसाहित्य संमेलनाचे उदघाटन व परिसंवाद कार्यक्रम होणार असून यासाठी श्री, विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन, पंढरपूरचे अध्यक्ष हणमत बागल हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. तर संमेलनाध्यक्ष म्हणून यवतमाळ मधील जेष्ठ विचारवंत, लेखक व तत्वचिंतक डॉ अशोक राणा तर संतविचार पीठ, पंढरपूर चे अध्यक्ष ह.भ.प. भारत जाधव महाराज हे स्वागताध्यक्ष राहणार आहेत. दुपारी सुप्रसिद्ध भारुड गायिका सौ. चंदाताई तिवारी व त्यांच्या सहकार्याचे भारुड हा लोककला प्रकार सादर होणार आहे. यासाठी जेष्ठ पत्रकार व संपादक शिवाजी शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. दुपारच्या भोजनानंतर 'संताची चळवळ' या 'धार्मिक व सामाजिक' या विषयावर पहिले परिसंवाद होणार आहे. 

 सायंकाळी 'साने गुरुजी व संतविचार' या विषयावर दुसर्या परिसंवादाचे आयोजन केले आहे. येथील श्रीसंत तनपुरे महाराज मठामध्ये समन्वय व आढावा बैठक आयोजित केले असून यामध्ये महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. 

अखेरच्या दिवशी शुक्रवार रोजी सकाळी ७. वा. नामदेव पायरी समोर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदीर, महाद्वार येथे 'समतेचा जागर' भजन, गीत व घोषणा इ. श्री. संत चोखोबाराय यांचा श्री. पांडुरंग दर्शन सोहळा साजरा होणार आहे.

 श्रीसंत कैकाडी महाराज विश्वपुण्यधाम मंदीर येथे  ह.भ.प. भारत जाधव महाराज यांच्या अध्यक्षतेखाली 'संतविचार आणि अस्पृश्यता निवारण या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले आहे. अशी माहिती संवादक सारंग कोळी, दादा साहेब रोंगे आदींन  दिली यावेळी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form